England Announce Playing XI For 5th Test Ben Stokes Miss Out Right Shoulder Injury : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. कर्णधार बेन स्टोक्सच्या रुपात इंग्लंडच्या संघाला या कसोटी सामन्याआधी मोठा धक्का बसला आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून आउट झाला आहे. त्याच्या जागी ओली पोप इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंग्लंडच्या ताफ्यात मोठे बदल
कर्णधार बेन स्टोक्सशिवाय मँचेस्टरच्या मैदानात आठ वर्षांनी पदार्पणाची संधी मिळालेला लियाम डॉसन आणि जोफ्रा आर्चरसह ब्रायडन कार्सचाही प्लेइंग इलेव्हनमधील पत्ता कट झाला आहे. पाचव्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने युवा खेळाडूंना संधी दिल्याचे दिसते. जॅकब बेथेल याची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली असून त्याच्याशिवाय जलगती गोलंदाज गस एटकिंसन, जेमी ओव्हरटन आणि जोश टंग यांना संघात स्थान मिळाले आहे.
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
बुमराहला जमलं नाही ते बेन स्टोक्सनं करून दाखवलंय, पण आता...
भारत-इंग्लंड यांच्यातील मालिकेत जसप्रीत बुमराहला जे जमलं नाही ते बेन स्टोक्सनं करून दाखवलंय. या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वलस्थानावर आहे. टीम इंडियासाठी तो डोकेदुखी ठरल्याचे पाहायला मिळाले. मँचेस्टर कसोटी सामन्यात पाच विकेट्सचा डाव साधल्यावर त्याने शतकी खेळी केली होती. पण खांद्याच्या दुखापतीमुळे आता त्याला पाचव्या सामन्याला मुकावे लागत आहे. ही गोष्ट टीम इंडियाला मोठा दिलासा देणारी आहे. या संधीचा फायदा घेत टीम इंडिया मालिकेत २-२ अशी बरोबरी साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.
पाचव्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन
झॅक क्रॉउली, बेन डकेट, ओली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जॅकब बेथेल, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, जेमी ओव्हरटन,जोश टंग
Web Title: England Announce Playing XI For 5th Test vs India Ben Stokes Miss Out On The Final Test Of The Series With A Right Shoulder Injury at Kennington Oval London
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.