ENG vs PAK : ३३१ धावा करूनही पाकिस्तान हरला; इंग्लंडच्या 'B' टीमनं जगासमोर बाबर आजमच्या टीमचं वस्त्रहरण केलं 

England won by 3 wickets in 3rd ODI इंग्लंड दौऱ्यावर वन डे मालिकेत इभ्रत वाचवण्यासाठी तिसऱ्या वन डे सामन्यात मैदानावर उतरलेल्या पाकिस्ताननं दमदार खेळ केला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 10:32 AM2021-07-14T10:32:31+5:302021-07-14T10:32:55+5:30

whatsapp join usJoin us
ENG vs PAK : England won by 3 wickets in 3rd ODI, Record-breaking Babar Azam's ODI best can't stop England sweep of Pakistan | ENG vs PAK : ३३१ धावा करूनही पाकिस्तान हरला; इंग्लंडच्या 'B' टीमनं जगासमोर बाबर आजमच्या टीमचं वस्त्रहरण केलं 

ENG vs PAK : ३३१ धावा करूनही पाकिस्तान हरला; इंग्लंडच्या 'B' टीमनं जगासमोर बाबर आजमच्या टीमचं वस्त्रहरण केलं 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे बाबरनं १३९ चेंडूंत १४ चौकारांसह ४ षटकार खेचून १५८ धावा कुटल्या. त्याचे हे वन डे तील १४ वे शतक ठरले. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये १४ शतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्यानं ८१ डावांत हा पराक्रम करताना दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमला ( ८४), ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर ( ९८) आणि भारताचा विराट कोहली ( १०३) यांचा विक्रम मोडला.

England vs Pakistan 3rd ODI : इंग्लंड दौऱ्यावर वन डे मालिकेत इभ्रत वाचवण्यासाठी तिसऱ्या वन डे सामन्यात मैदानावर उतरलेल्या पाकिस्ताननं दमदार खेळ केला. पहिल्या दोन वन डेत अपयशी ठरलेल्या कर्णधार बाबर आजमनं ( Babar Azam) विक्रमी खेळी करून संघाला ३३१ धावांचा डोंगर उभा करून दिला. पण, इंग्लंडच्या B संघातील युवा खेळाडूंनी तिसरा वन डे सामना जिंकून मालिका ३-० अशी खिशात घातली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा निम्मा संघ १६५ धावांत माघारी परतला होता, तरीही पाकिस्तानला विजय मिळवता आला नाही. जेम्स व्हिंस आणि लुईस ग्रेगरी या युवा खेळाडूंनी पाकिस्तानच्या अनुभवी गोलंदाजांची धुलाई केली. 

प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या पाकिस्ताननं ९ बाद ३३१ धावांचा डोंगर उभा केला. फखर जमान ( ६)  लगेच माघारी परतल्यानंतर इमाम-उल-हक आणि बाबर यांनी दमदार खेळ केला. त्यांनी दुसरा विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. इमाम ७३  चेंडूंत ७ चौकारांसह ५६ धावा केल्या. त्यानंतर बाबर व मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२० चेंडूंत १७९ धावांची भागीदारी केली. रिझवाननं ५८ चेंडूंत ७४ धावा केल्या. बाबरनं १३९ चेंडूंत १४ चौकारांसह ४ षटकार खेचून १५८ धावा कुटल्या. त्याचे हे वन डे तील १४ वे शतक ठरले. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये १४ शतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला. ( Babar Azam became the fastest to 14 ODI centuries ) त्यानं ८१ डावांत हा पराक्रम करताना दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमला ( ८४), ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर ( ९८) आणि भारताचा विराट कोहली ( १०३) यांचा विक्रम मोडला. 

प्रत्युत्तरात डेवीड मलान शून्यावर बाद झाला. फिल सॉल्ट ( ३७), झॅक क्रॅवली ( ३९) व कर्णधार बेन स्टोक्स ( ३२) यांना मोठी खेळी करण्यात अपयश आलं. इंग्लंडचे पाच फलंदाज १६५ धावांत माघारी परतले होते. त्यामुळे पाकिस्तान विजय मिळवून इभ्रत वाचवतील असेच वाटले होते. मात्र, जेम्स व्हिंस आणि लुईस ग्रेगरी हे पाकिस्तानच्या विजयाच्या मार्गात खंबीरपणे उभे राहिले. या दोघांनी पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत १२९ धावांची भागीदारी केली. इंग्लंडनं ३ विकेट्स व १२ चेंडू राखून ७ बाद ३३२ धावा करत विजय मिळवला. व्हिंसनं ९५ चेंडूंत ११ चौकारांसह १०२ धावा केल्या. ग्रेगरीनं ६९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७७ धावा केल्या. 

Web Title: ENG vs PAK : England won by 3 wickets in 3rd ODI, Record-breaking Babar Azam's ODI best can't stop England sweep of Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.