KL Rahul A Set New Record With Third Test Hundred In England : लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळात लोकेश राहुलनं संयमी खेळीसह आपल्या कसोटी कारकिर्दीतील ९ वे शतक साजरे केले. या खेळीसह सुनील गावसकर, राहुल द्रविड यासारख्या दिग्गजांना मागे टाकत लोकेश राहुलनं इंग्लंडच्या मैदानात नवा इतिहास रचला आहे. तो भारताकडून इंग्लंडच्या मैदानात सर्वाधिक शतके झळकवणारा सलामीवीर ठरला आहे. एका शतकासह त्याने चार दिग्गजांना मागे टाकत या यादीत अव्लस्थानी झेप घेतली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तिसऱ्या शतकासह KL राहुलनं रचला नवा विक्रम
इंग्लंडच्या मैदानातील केएल राहुलच्या भात्यातून आलेले हे तिसरे शतक ठरले. ७ सप्टेंबर २०१८ रोजी 'द ओव्हल' च्या मैदानात लोकेश राहुलनं इंग्लंडच्या मैदानातील पहिले शतक साजरे केले होते. भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना त्याने १४९ धावांची खेळी केली होती. २०२१ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानात त्याने नाबाद १२७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता हेडिंग्लेच्या मैदानात त्याच्या भात्यातून तिसरे शतक पाहायला मिळाले.
ENG vs IND : इंग्लंडचे कपडे पांढरे शुभ्र आणि आपले ऑफ व्हाईट का? जाणून घ्या यामागची रंजक गोष्ट
इंग्लंडच्या मैदानात डावाची सुरुवात करताना सर्वाधिक शतके झळकवणारे फलंदाज
इंग्लंडच्या मैदानात सलामीवीराच्या रुपात सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत लोकेश राहुल ३ शतकासह आता पहिल्या स्थानावर आहे. राहुल द्रविड, सुनील गावसकर, विजय मर्चेंट आणि रवी शास्त्री या चार दिग्गजांच्या नावे इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करताना प्रत्येकी २ शतकांची नोंद आहे.
Web Title: ENG vs IND KL Rahul A Set New Record With Third Test Hundred In England Surpassed Rahul Dravid Sunil Gavaskar As Indian Openers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.