ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...

इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर आयुष म्हात्रेनं वैभव सूर्यंवशीच्या साथीनं युवा टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 20:01 IST2025-06-30T19:57:49+5:302025-06-30T20:01:08+5:30

whatsapp join usJoin us
ENG vs IND Captain Ayush Mhatre goes for a golden duck Vaibhav Suryavanshi scored 45 runs off 34 balls in the second ODI against England U19 | ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...

ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England U19 vs India U19, 2nd Youth ODI : इंग्लंड दौऱ्यावर भारतीय अंडर १९ संघाचे नेतृत्व करणाऱ्या आयुष म्हात्रेवर दुसऱ्या वनडे सामन्यात 'गोल्डन डक'ची नामुष्की ओढावली आहे. यूथ वनडे स्पर्धेतील भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील १९ वर्षाखालील संघात खेळवण्यात येत असणारा सामना नॉर्थहॅम्प्टनच्या काउंटी क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर आयुष म्हात्रेनं वैभव सूर्यंवशीच्या साथीनं युवा टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केली. पण त्याला आपली छाप सोडता आली नाही. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

आयुष म्हात्रे पहिल्याचं चेंडूवर तंबूत, वैभव सूर्यंवशी टिकला, पण...

भारतीय संघाच्या डावातील पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर फ्रेंच याच्या गोलंदाजीवर आयुष म्हात्रेत बोल्ड झाला. कर्णधार स्वस्तात माघारी फिरल्यावर नॉन स्ट्राइक एन्डला असलेल्या १४ वर्षी वैभव सूर्यंवशीनं विहान मल्होत्राच्या साथीनं अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पण अर्धशतकाच्या जवळ पोहत्यावर त्यानेही आपली विकेट फेकली. विहानसोबत दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी करणाऱ्या वैभव सूर्यंवशीनं ३४ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४५ धावांची खेळी केली.  

'चायनामन' खरंच टीम इंडियासाठी फायद्याचा ठरु शकतो का? इंग्लंडविरुद्ध रेकॉर्ड भारी, पण...

एकही अर्धशतक नाही, ३०० पारचं गणित चुकलं

युवा टीम इंडियाकडून विहान मल्होत्रा याने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. . त्याच्याशिवाय राहुल कुमार ४७ (४७),  किनिष्क चौहान ४५ (४०) यांनी उपयुक्त धावा केल्या. पण एकालाही अर्धशतक साजरे करता आले नाही. एवढेच नाहीत तर भारतीय संघ ४९ व्या षटकातच ऑल आउट झाला. त्यामुळे ३०० पारचं गणितही चुकलं. ४९ षटकात सर्वबाद २९० धावा करत युवा टीम इंडियाने इंग्लंडच्या संघासमोर २९१ धावांचे आव्हान सेट केले आहे. इंग्लंडच्या संघाला रोखतं सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी युवा टीम इंडिया प्रयत्नशील असेल.

Web Title: ENG vs IND Captain Ayush Mhatre goes for a golden duck Vaibhav Suryavanshi scored 45 runs off 34 balls in the second ODI against England U19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.