Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास

फक्त १६ डावात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा गाठणाऱ्या युवा खेळाडूंच्या क्लबमध्येही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 10:51 IST2025-08-29T10:45:08+5:302025-08-29T10:51:25+5:30

whatsapp join usJoin us
Duleep Trophy 2025 Vidarbha’s Danish Malewar records history with double century on debut after Ranji final heroics | Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास

Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Danish Malewar Double Century Duleep Trophy 2025 : दुलीप करंडक स्पर्धेतील मध्य विभाग संघाकडून पदार्पणात दानिश मालेवारने इतिहास रचला आहे. तो स्पर्धेत पदार्पणात द्विशतकी डाव साधणारा पहिला विदर्भकर ठरला आहे. बंगळुरूच्या मैदानात सुरु असलेल्या ईशान्य विभाग विरुद्धच्या पहिल्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी त्याने द्विशतक साजरे केले. याआधी पदार्पणात शतकी खेळीचा विक्रम प्रस्थापित केल्यावर त्याने द्विशतकी डाव साधला आहे.  २२० चेंडूत ३६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने त्याने  २०० धावा पूर्ण केल्या. विक्रमी डाव साधल्यावर दानिश मालेवार २०३ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. या खेळीसह सर्वात जलद म्हणजे फक्त १६ डावात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा गाठणाऱ्या युवा खेळाडूंच्या क्लबमध्येही त्याचा समावेश झाला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

एक द्विशतक, एक शतक अन् दोन अर्धशतके

दानिश मालेवार याने २२२ चेंडूत केलेल्या २०३ धावा आणि कर्णधार रजत पाटीदारच्या शतकी खेळीसह आर्यन जुयाल आणि यश राठोड यांच्या भात्यातून अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली. या चौघांच्या खेळीच्या जोरावर मध्य विभाग संघाने अवघ्या ३ विकेट्सच्या मोबदल्यात ४७८ पेक्षा अधिक धावा करत सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.

दानिश मालेवारची प्रथम श्रेणीतील कामगिरी
 

संघ (कोणासाठी)प्रतिस्पर्धी संघदिनांकधावा
विदर्भआंध्र प्रदेश११ ऑक्टोबर २०२४८ व ६१
विदर्भउत्तराखंड२६ ऑक्टोबर २०२४५६ व ४२
विदर्भहिमाचल प्रदेश६ नोव्हेंबर २०२४५९
विदर्भगुजरात१३ नोव्हेंबर २०२४११५
विदर्भराजस्थान२३ जानेवारी २०२५१७
विदर्भहैदराबाद३० जानेवारी २०२५१३ व ३
विदर्भतामिळनाडू८ फेब्रुवारी २०२५७५ व ०
विदर्भमुंबई१७ फेब्रुवारी २०२५७९ व २९
विदर्भकेरळ२६ फेब्रुवारी २०२५१५३ व ७३
मध्य विभाग (Central Zone)उत्तर-पूर्व विभाग२८ ऑगस्ट २०२५२०३

 

...अन् नागपूरकरामध्ये दिसली केएल राहुलची झलक

नागपूरकर क्रिकेटर मोठ्या खेळीनंतर KL राहुलच्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशनमुळेही लक्षवेधी ठरला आहे. रणजी स्पर्धेतील फायनलमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक साजरे केल्यावर त्याने  शट द नॉइज (Shut The Noise) तोऱ्यात शतकाचा आनंद व्यक्त केला होता. लोकेश राहुलला हा आवडता खेळाडू असल्यामुळे आणि त्याची ती शैली भावल्यामुळे असा आनंद व्यक्त केल्याची गोष्टही २१ वर्षीय बॅटरनं बोलून दाखवली होती. 

सेलिब्रेशन मागची गोष्ट

लोकेश राहुल  बाहेरच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून खेळावर फोकस करण्यावर भर देतोय, हे सांगण्याचा प्रयत्न Shut The Noise सेलिब्रेशनमधून  करताना पाहायला मिळाले आहे. त्याची ही स्टाईल इंग्लिश फुटबॉलपटू मेसन माउंटची कॉपी आहे. त्याचा हा अंदाज  विदर्भकर फॉलो करताना पाहायला मिळाले आहे. फक्त सेलिब्रेशनच नाही तर हा क्रिकेटपटू तंत्रशुद्ध फलंदाजीमध्येही केएल राहुलसारखा आहे, अशी चर्चाही क्रिकेट वर्तुळात त्याने केलेल्या KL राहुल सेलिब्रेशनपासून रंगताना दिसते. 

Web Title: Duleep Trophy 2025 Vidarbha’s Danish Malewar records history with double century on debut after Ranji final heroics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.