या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार

Digvesh Rathi : दिग्वेश राठी IPL 2025 मध्ये आपल्या आगळ्यावेगळ्या सिग्नेचर सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 20:18 IST2025-07-07T20:17:55+5:302025-07-07T20:18:41+5:30

whatsapp join usJoin us
Digvesh Rathi: This team paid more money than IPL, Lucknow Super Giants Digvesh Rathi will now play for this team | या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार

या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Digvesh Rathi : लखनऊ सुपर जायंट्स (LSG) चा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठी आपल्या आगळ्यावेगळ्या सिग्नेचर सेलिब्रेशनमुळे चर्चात आला होता. याबद्दल त्याला अनेकदा दंहडी आकारण्यात आला. दरम्यान, राठी आता एका नवीन संघासोबत खेळताना दिसणार आहे. या संघाने त्याला IPL 2025 पेक्षा जास्त पैसे दिले आहेत. IPL 2025 मध्ये राठीला 30 लाख रुपये मिळाले होते, तर या नवीन संघाने त्याला 38 लाख रुपयांना विकत घेतले आहे. 

DPL चा दुसरा सर्वात महागडा खेळाडू 
LSG चा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठी आता दिल्ली प्रीमियर लीग (DPL) च्या दुसऱ्या हंगामात खेळताना दिसणार आहे. त्याला साउथ दिल्ली सुपरस्टार्सने 38 लाख रुपयांना खरेदी केले आहे. तो या लीगचा दुसरा सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. IPL 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा सिमरजीत सिंग या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. त्याला सेंट्रल दिल्ली किंग्जच्या संघात 39 लाख रुपयांना संघात घेतले. 

दिग्वेश राठी वादात राहिला
दिग्वेश राठीने IPL 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना चांगली कामगिरी केली. पण, आपल्या आगळ्यावेगळ्या सिग्नेचर सेलिब्रेशनमुळे तो वादात सापडला होता. या दरम्यान, त्याला एका सामन्यासाठी बंदी देखील घालण्यात आली होती. तसेच, BCCI ने त्याला दोनदा दंडही ठोठावला होता. राठीने आयपीएल 2025 लखनऊसाठी 13 सामने खेळले. या दरम्यान त्याने 8.25 च्या इकॉनॉमीने 14 विकेट घेतल्या. 

Web Title: Digvesh Rathi: This team paid more money than IPL, Lucknow Super Giants Digvesh Rathi will now play for this team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.