IPL 2020 : CSKचा कोरोना पॉझिटिव्ह गोलंदाज कोण ते समजलं; सुरेश रैनासह आलेला इतरांच्या संपर्कात

IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 11:02 AM2020-08-29T11:02:47+5:302020-08-29T11:03:50+5:30

whatsapp join usJoin us
Deepak Chahar identified as CSK player to test positive for COVID-19, BCCI puts IPL 2020 schedule on hold | IPL 2020 : CSKचा कोरोना पॉझिटिव्ह गोलंदाज कोण ते समजलं; सुरेश रैनासह आलेला इतरांच्या संपर्कात

IPL 2020 : CSKचा कोरोना पॉझिटिव्ह गोलंदाज कोण ते समजलं; सुरेश रैनासह आलेला इतरांच्या संपर्कात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 13व्या मोसमाला सुरुवात होण्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाज आणि 10 स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यामुळे चेन्नईच्या सर्व खेळाडूंना पुन्हा क्वारंटाईन करावं लागलं. कोरोना पॉझिटिव्ह असलेला खेळाडू हा जलदगती गोलंदाज असून तो नुकताच भारतीय संघाकडून खेळला होता, असे सांगण्यात येत होते. शनिवारी तो गोलंदाज कोण, हे समोर आलं आणि चेन्नई ते दुबई प्रवासात तो सुरेश रैनासह अनेकांचा संपर्कात आल्याचेही समोर आले आहे. चेन्नईचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं बीसीसीआयनं आयपीएलचं वेळापत्रक होल्डवर ठेवलं आहे. 

IPL 2020 : CSKचा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह; आता आयपीएल 2020 होणार रद्द?

भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल ) 13वा हंगाम संयुक्त अरब अमिरातीय येथे खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. 19 सप्टेबंर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व संघ एक महिना आधीच येथे दाखल झाले आणि 6 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून अनेक संघाचे खेळाडू सरावासाठी मैदानावरही उतरले. पण, चेन्नईचा संघ अजूनही क्वारंटाईनमध्ये आहे.   

काही इंग्रजी वृत्तपत्रांच्या बातमीनुसार दीपक चहर हा कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला खेळाडू आहे. बीसीसीआय किंवा चेन्नईनं त्याबाबत  अजूनही अधिकृत घोषणा केलेली नाही. ''चेन्नईच्या कॅप्मसाठी अनेक खेळाडू दूरून प्रवास करून आले होते. सर्व संघासाठी हे आव्हानात्मक कालावधी आहे. चेन्नईच्या खेळाडूंची अनेकवेळा चाचणी केली जाईल आणि त्यानंतर त्यांना सरावाची परवानगी दिली जाईल. चहरला आता 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. त्यानंतर त्याची चाचणी केली जाईल आणि 24 तासांत दोन अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला मैदानावर उतरण्याची संधी मिळेल,''असे CSKच्या सूत्रांनी सांगितले.  

Web Title: Deepak Chahar identified as CSK player to test positive for COVID-19, BCCI puts IPL 2020 schedule on hold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.