On This Day : इरफान पठाणच्या 'या' विक्रमाने पाकिस्तानचे मोडले होते कंबरडे, पण... 

फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्याच्या प्रयत्नात इरफानच्या कारकिर्दीत स्पीडब्रेकर उभे राहिले आणि सरते शेवटी त्याच्या कारकिर्दीला ब्रेक लावला.

By स्वदेश घाणेकर | Published: January 29, 2021 09:58 AM2021-01-29T09:58:58+5:302021-01-29T09:59:17+5:30

whatsapp join usJoin us
On This Day in 2006, Irfan Pathan became the first bowler to take a hat-trick in the opening over of a Test | On This Day : इरफान पठाणच्या 'या' विक्रमाने पाकिस्तानचे मोडले होते कंबरडे, पण... 

On This Day : इरफान पठाणच्या 'या' विक्रमाने पाकिस्तानचे मोडले होते कंबरडे, पण... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इरफान पठाण ( Irfan Pathan)... भारतीय संघातील असं एक नाव की ज्यानं त्याच्या स्वींग गोलंदाजीनं तगड्या प्रतिस्पर्धींना गुडघे टेकण्यास भाग पाडले.  इरफाननं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत टीम इंडियाला दिलेलं योगदान आणि उल्लेखनीय कामगिरी अजूनही चाहते विसणार नाही. असाच एक पराक्रम इरफाननं २००६ साली बरोबर आजच्याच दिवशी केला होता आणि असा विक्रम करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला होता. पण, त्याच्या या विक्रमाला टीम इंडियाच्या विजयाची जोड मिळाली असती तर आणखी बरे झाले असते.

भारतीय संघ २००६ मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने अनिर्णित राहिल्यामुळे कराचीत होणाऱ्या तिसऱ्या सामन्यावर सर्वांचे लक्ष लागले होते. टीम इंडियानं कंबर कसली होती आणि पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजीला मैदानावर उतरला. झहीर खान, आर पी सिंग हे अनुभवी गोलंदाज संघात असतानाही कर्णधार राहुल द्रविडनं पहिले षटक इरफानच्या हाती सोपवले. तीन चेंडू निर्धाव टाकल्यानंतर इरफाननं पुढील तीन चेंडूंवर करिष्माच केला. चौथ्या चेंडूवर पाकिस्तानचा सलामीवीर सलमान बट स्लीपमध्ये उभ्या असलेल्या द्रविडच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर कर्णधार युनिस खानला त्यानं पायचीत पकडले, हॅटट्रिक चेंडूवर इरफाननं मोहम्मद युसूफचा त्रिफळा उडवून इतिहास घडवला. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला. T10 League : अब्दुल शकूरचा कहर; चोपलं १४ चेंडूंत अर्धशतक, मराठा अरेबियन्सला मिळवून दिला एकहाती विजय

पाकिस्तानचा पहिला डाव २४५ धावांवर गडगडल्यानंतर टीम इंडियाला पहिल्या डावात २३८ धावा करता आल्या. इरफाननं पहिल्या डावात ६१ धावांत ५ विकेट्स घेतल्या. पाकिस्ताननं दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या गोलंदाजांचा चुराडा केला आणि ७ बाद ५९९ धावांवर डाव घोषित केला. टीम इंडियाला विजयासाठीच्या ६०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही. भारताचा दुसरा डाव २६५ धावांवर गडगडल्यानं पाकिस्ताननं हा सामना ३४१ धावांनी जिंकला. India vs England :  भारतीय खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह, BCCIकडून खेळाडूंना गिफ्ट!


इरफाननं गतवर्षी जानेवारीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. इरफाननं २९ कसोटीत ११०५ धावा आणि १०० विकेट्स घेतल्या. १२० वन डे व २४ ट्वेंटी-20 सामन्यांत त्याच्या नावावर अनुक्रमे १५४४ धावा व १७३ विकेट्स आणि १७२ धावा व २८ विकेट्स आहेत.

Web Title: On This Day in 2006, Irfan Pathan became the first bowler to take a hat-trick in the opening over of a Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.