CSK vs RR Latest News : Test-ing Times; चेन्नई सुपर किंग्सनं स्वतःच्या संघाला केलं ट्रोल, ट्विट व्हायरल

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात Play Offच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यासाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.  या शर्यतीतून बाद होण्यासाठी एक पराभवही पुरेसा आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 19, 2020 10:49 PM2020-10-19T22:49:08+5:302020-10-19T22:49:30+5:30

whatsapp join usJoin us
CSK vs RR Latest News : Chennai Super Kings twitter handle trolling their own team, tweet viral | CSK vs RR Latest News : Test-ing Times; चेन्नई सुपर किंग्सनं स्वतःच्या संघाला केलं ट्रोल, ट्विट व्हायरल

CSK vs RR Latest News : Test-ing Times; चेन्नई सुपर किंग्सनं स्वतःच्या संघाला केलं ट्रोल, ट्विट व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात Play Offच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यासाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.  या शर्यतीतून बाद होण्यासाठी एक पराभवही पुरेसा आहे. CSK vs RR या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचे फलंदाज राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांसमोर चाचपडताना दिसले. पण, महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) त्याच्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करताना गोलंदाजांचा योग्य वापर करून घेतला. राजस्थान रॉयल्सचे ३ फलंदाज २८ धावांत माघारी परतले होते. पण, जोस बटलर व स्टीव्ह स्मिथ यांनी राजस्थान रॉयल्सला विजयाच्या दिशेनं कूच करून दिली. यावेळी चेन्नई सुपर किंग्सच्या ट्विटर हँडलनं स्वतःच्या टीमला ट्रोल केलं. 

प्रथम फलंदाजीला आलेल्या फॅफ ड्यू प्लेसिस आणि सॅम कुरन यांना मोठे फटके मारण्यापासून राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी रोखले. जोफ्रा आर्चरनं पुन्हा भेदक मारा करताना प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखडून ठेवले. त्याचे फळ तिसऱ्या षटकात मिळाले. आर्चरच्या बाऊंसरवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फटका मारणाऱ्या फॅफ ड्यू प्लेसिसला माघारी जावं लागले. आज क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असलेल्या जोस बटलरनं हवेत झेपावत सुरेख झेल टिपला. फॅफ १० धावांवर माघारी परतला. कार्तिक त्यागीचे पहिल्याच षटकात तीन चौकाराने स्वागत झाले, परंतु षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्यानं शेन वॉटसनला ( ८) माघारी पाठवून CSKला मोठा धक्का दिला.

त्यानंतर आलेल्या अंबाती रायुडूनं ( Ambati Rayudu) स्वतःचं नाव एका वेगळ्या पंक्तीत नोंदवले. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ५००० धावा करणारा तो ११वा भारतीय फलंदाज ठरला. ९व्या षटकात श्रेयस गोपाळच्या पहिल्याच चेंडूवर कुरनचा झेल यष्टिरक्षक संजू सॅमसननं झेल सोडला. जीवदान मिळाल्यानंतर कूरन मोठी खेळी करेल असे वाटत होते, परंतु पुढच्याच चेंडूवर फटका मारण्याचा मोह तो आवरू शकला नाही. कुरन ( २२) जोस बटलरकरवी झेलबाद होऊन माघारी परतला. राहुल टेवाटियानं CSKला धक्का देताना रायुडूला ( १३) बाद करून RRला मोठे यश मिळवून दिले. चेन्नईचे आघाडीचे चार फलंदाज अवघ्या ५६ धावांत तंबूत परतले होते.  

कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी चेन्नई सुपर किंग्सचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांच्या टिच्चून माऱ्यासमोर त्या दोघांना धावा घेताना चाचपडावे लागले. RRच्या गोलंदाजांनी CSKच्या दोन दिग्गजांना मोठे फटकेच खेळू दिले नाही. त्यांनी अर्धशतकी भागीदारी केली असली तरी त्यांचा धावांचा वेग हा संथ ठेवण्यात RRच्या गोलंदाजांना यश आले. १८व्या षटकात २८ धावांवर धोनी धावबाद झाला. चेन्नईला २० षटकांत ५ बाद १२५ धावा करता आल्या. जडेजा ३५ धावांवर नाबाद राहिला.  

प्रत्युत्तरात राजस्थानची सुरुवातही निराशाजनक झाली. बेन स्टोक्स  (१९), रॉबीन उथप्पा ( ४) आणि संजू सॅमसन ( ०) यांना लगेच माघारी जावे लागले. महेंद्रसिंग धोनीनं पाचव्या षटकात दीपक चहरच्या गोलंदाजीवर घेतलेला झेल पाहून सारेच थक्क झाले. RRचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि जोस बटलर यांनी CSKच्या गोलंदाजांचा सामना करताना गाडी रुळावर आणली. धोनीनं पहिल्या दहा षटकांत दीपक चहर ( २/१८) व जोश हेझलवूड ( १/१९) यांचे प्रत्येकी चार षटक वापरली. बटलर व स्मिथ यांनी अर्धशतकी भागीदारी करताना राजस्थानला विजयी मार्गावर ठेवले. बटलरने ३७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. यावेळी चेन्नई सुपर किंग्सच्या ट्विटर हँडलनं स्वतःच्या टीमला ट्रोल केलं. 


 

Web Title: CSK vs RR Latest News : Chennai Super Kings twitter handle trolling their own team, tweet viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.