CSK vs KXIP : किंग्स इलेव्हन पंजाबला नमवल्यानंतर शेन वॉटसनचं ट्विट व्हायरल, जाणून घ्या कारण

आजचा दिवस CSKचा ठरला. शेन वॉटसन ( Shane Watson) आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis) यांनी वैयक्तिक अर्धशतकासह पहिल्या विकेटसाठी दमदार भागीदारी करून CSKला विजय मिळवून दिला. 

By स्वदेश घाणेकर | Published: October 5, 2020 07:45 AM2020-10-05T07:45:00+5:302020-10-05T09:42:37+5:30

whatsapp join usJoin us
CSK vs KXIP: Shane Watson's 3rd October tweet goes on viral after Chennai Super Kings beat Kings XI Punjab | CSK vs KXIP : किंग्स इलेव्हन पंजाबला नमवल्यानंतर शेन वॉटसनचं ट्विट व्हायरल, जाणून घ्या कारण

CSK vs KXIP : किंग्स इलेव्हन पंजाबला नमवल्यानंतर शेन वॉटसनचं ट्विट व्हायरल, जाणून घ्या कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

CSK vs KXIP Latest News : फॉर्मात असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) संघाला रविवारी चेन्नई  सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) सहज पराभूत केले. लोकेश राहुल ( KL Rahul) आणि मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) यांनी सुरुवातही तशीच करून दिली. पंजाबनं CSKसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. आजचा दिवस CSKचा ठरला. शेन वॉटसन ( Shane Watson) आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis) यांनी वैयक्तिक अर्धशतकासह पहिल्या विकेटसाठी दमदार भागीदारी करून CSKला विजय मिळवून दिला. 

शेन वॉटसन-फॅफ ड्यू प्लेसिस यांची पराक्रमी भागीदारी; मोडला सचिन तेंडुलकरचा ८ वर्षांपूर्वीचा विक्रम!

लोकेश राहुल ( ६३), मयांक अग्रवाल ( २६), मनदीप सिंग ( २७) निकोलस पूरन ( ३३) यांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने ४ बाद १७८ धावांपर्यंत मजल मारली. CSKकडून असे प्रत्युत्तर मिळेल, याची कल्पना पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल यानंही केली नसावी. फॉर्माशी झगडत असलेल्या शेन वॉटसननं KXIPच्या गोलंदाजांवर प्रहार केला. त्याच्या जोडीला फॅफ ड्यू प्लेसिस होताच. आतापर्यंत सलामीच्या जोडीचं अपयश CSKची डोकेदुखी ठरत होती, त्याच सलामीवीरांनी विजयाचा मजबूत पाया रचला. 

या दोघांनी KXIPच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना दमदार भागीदारी केली. वॉटसन ५३ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ८३ धावा केल्या, तर फॅफनं ५३ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारासह ८७ धावांवर नाबाद राहीला. चेन्नईनं १७.४ षटकांत बिनबाद १८१ धावा केल्या. या विजयानंतर शेन वॉटसननं ३ ऑक्टोबरला केलेलं ट्विट व्हायरल होऊ लागलं. २ ऑक्टोबरला सनरायझर्स हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर वॉटसननं हे ट्विट केलं होतं. त्यात लिहिलं होतं की,''चेन्नई सुपर किंग्ससाठी परफेक्ट सामना येणं बाकी आहे.''

 

Web Title: CSK vs KXIP: Shane Watson's 3rd October tweet goes on viral after Chennai Super Kings beat Kings XI Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.