DC vs CSK Latest News & Live Score :चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) IPL2020मधील आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ( Delhi Capitals) पराभव पत्करावा लागला. संयमी सुरुवातीनंतर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी चांगली फटकेबाजी केली. त्यानंतर श्रेयस अय्यर व रिषभ पंत यांनी दमदार खेळ करताना दिल्लीला समाधानकारक पल्ला गाठून दिला.  त्यानंतर DCच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करताना CSKवर सातत्यानं दडपण टाकले. MS Dhoniचा फलंदाजीला येण्याचा क्रम पुन्हा चुकल्यानं CSKच्या फलंदाजांवरील दडपण अधिक वाढत गेले आणि त्याचाही फायदा दिल्लीला झाला. श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) आपल्या नेतृत्वगुणाचा योग्य वापर करताना CSKला हार मानण्यास भाग पाडले. 

DC vs CSK Latest News & Live Score :
 

महेंद्रसिंग धोनीचा अफलातून झेल; दिल्लीच्या कर्णधाराला पाठवलं माघारी, Video 

क्रिज बाहेर जाण्याआधी यष्टिंमागे कोण आहे हे लक्षात ठेवा; MS Dhoniची सुपर स्टम्पिंग

महेंद्रसिंग धोनीनं केली सुरेश रैनाशी बरोबरी; दोघांच्याच नावावर आहे हा विक्रम

IPL 2020 : आम्हालाही तो आदर मिळायला हवा, असं नाही का वाटत? गावस्करांच्या कमेंटवर अनुष्का भडकली

शब्दाला शब्द वाढतोय; अनुष्का शर्माच्या टीकेवर सुनील गावस्कर यांचं मोजक्या शब्दात उत्तर

-175 धावांचा पाठलाग करताना CSKनं 20 षटकांत 7 बाद 131 धावा केल्या. DC ने हा सामना 44 धावांनी जिंकला.

-डू प्लेसिस आणि केदार जाधव यांनी काही सुरेख फटके मारताना अर्धशतकी भागीदारी केली. पण, नॉर्झेनं CSKची ही वेल सेट जोडी तोडली. त्यानं केदार जाधवला 26 धावांवर पायचीत केले. रवींद्र जडेजा किंवा सॅम कुरन यांना न पाठवता MS Dhoni स्वतः मैदानावर उतरला. पण, धोनीचा टायमिंग चुकल्यासारखा वाटला, युवा फलंदाज ऋतुराजला आघाडीवर पाठवण्याचा डाव आजही फसला. CSKला अखेरच्या 18 चेंडूंत 65 धावा हव्या होत्या. दडपणात फॅफ 18व्या षटकात विकेट देऊन माघारी परतला. 

- डू प्लेसिस आणि केदार जाधव यांनी काही सुरेख फटके मारताना अर्धशतकी भागीदारी केली. पण, नॉर्झेनं CSKची ही वेल सेट जोडी तोडली. त्यानं केदार जाधवला 26 धावांवर पायचीत केले. रवींद्र जडेजा किंवा सॅम कुरन यांना न पाठवता MS Dhoni स्वतः मैदानावर उतरला. 

 ऋतुराज गायकवाडला आज मोठी खेळण्याची संधी होती, परंतु फॅफ डू प्लेसिससोबत ताळमेळ राखता न आल्यानं तो 10व्या षटकात धावबाद झाला. दरम्यान, डू प्लेसिसनं IPL मध्ये 2000 धावांचा पल्ला गाठला. 

दरम्यान, सुनील गावस्कर यांनी विराट-अनुष्का प्रकरणावरून पुन्हा त्यांची बाजू मांडली. ते म्हणाले,''मी कोणतीच Sexist कमेंट केली नाही. लॉकडाऊनमध्ये विराट कोहलीला क्रिकेटचा सराव करण्यास मिळाली नाही. याच काळात विराट आणि अनुष्काचा घरच्या टेरिसवर क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि तो सर्वांना पाहिला. मी त्यावरून म्हणालो की विराटला लॉकडाऊनमध्ये अनुष्काच्या गोलंदाजीचा सामना करावा लागला. 

- लक्ष्याचा पाठलाग करताना CSKला साजेशी सुरुवात करता आली नाही. मुरली विजय आणि शेन वॉटसन हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. अॅनरिच नॉर्झे आणि अक्षर पटेल यांनी CSKला धक्के दिले. पहिल्या पॉवर प्लेमध्ये CSKचे दोन्ही सलामीवीर 34 धावांत माघारी परतले होते. 

-  

दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ताबडतोड अर्धशतकी भागीदारी केली. सॅम कुरननं 19व्या षटकात सुरेख गोलंदाजी करताना DCच्या धावगतीला वेसण घातलं. त्यानं अय्यरला ( 26) बाद केले. यष्टिंमागे धोनीनं अफलातून झेल घेतला. दिल्लीनं 20 षटकांत 3 बाद 175 धावा केल्या. अखेरच्या षटकात 14 धावा चोपल्या गेल्या. रिषभनं 25 चेंडूंत नाबाद 37 धावा केल्या. 

पाहा व्हिडीओ...

दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ताबडतोड अर्धशतकी भागीदारी केली. 

पॉवर प्लेनंतर पृथ्वी व शिखर यांनी गिअर बदलला आणि दोघांनी फटकेबाजीला सुरुवात केली. पृथ्वीनं IPL2020मधील पहिले अर्धशतक 35 चेंडूत पूर्ण केले. पण 11 व्या षटकात ही जोडी पीयूष चावलानं तोडली. त्यानं धवनला ( 35) माघारी पाठवलं. पाठोपाठ चावलानं 64 धावांची खेळी करणाऱ्या पृथ्वीलाही बाद केलं.  

पॉवर प्लेनंतर पृथ्वी व शिखर यांनी गिअर बदलला आणि दोघांनी फटकेबाजीला सुरुवात केली. पृथ्वीनं IPL2020मधील पहिले अर्धशतक 35 चेंडूत पूर्ण केले. पण 11 व्या षटकात ही जोडी पीयूष चावलानं तोडली. त्यानं धवनला ( 35) माघारी पाठवलं. 
 

Image

Image

- DC ओपनर शिखर धवन ( Shikhar Dhawan) आणि पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) यांनी पॉवर प्लेमध्ये संयमी खेळ केली. दिल्लीनं  पहिल्या सहा षटकांत 36 धावा केल्या. त्यात पृथ्वीच्या 27, तर धवनच्या 7 धावांचा समावेश होता. 

चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) IPL2020मधील आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. CSKने संघात एक बदल केला असून लुंगी एनगिडीच्या जागी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेझलवूड याला संधी दिली आहे. DCच्या संघातही दोन बदल पाहायला मिळाले. दुखापतग्रस्त आर अश्विनच्या जागी अमित मिश्राला,तर मोहित शर्माच्या जागी आवेश खान याला संधी दिली आहे. 

Image

Image

Image

  • वेदर रिपोर्ट । दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश राहील. दिवसाचे तापमान ३९ डिग्री सेल्सियसच्या जवळपास राहण्याची शक्यता. वाºयाचा वेग २३ किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता.
  • पिच रिपोर्ट । खेळपट्टी फिरकीपटूंंना अनुकूल राहील. त्यात दोन्ही संघांचे फिरकीपटू वर्चस्व गाजवण्याची शक्यता.

मजबूत बाजू

चेन्नई । डेथ ओव्हर्समध्ये वेगाने धावा फटकावण्यास माहीर फलंदाज. रवींद्र जडेजा, लुंगी एनगिडी, पीयूष चावला कुठल्याही खेळपट्टीवर फलंदाजांना रोखण्यात सक्षम आहेत.
दिल्ली । विजयामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला. स्टोईनिसचा फॉर्म संघासाठी जमेची बाजू. रबादासारख्या गोलंदाजाची उपस्थिती.

कमजोर बाजू
चेन्नई । गेल्या लढतीत धोनीला वेगवान गोलंदाजांविरुद्ध आक्रमक खेळ करता आला नाही. मुरली विजय, केदार जाधव फॉर्मात नाहीत. फाफ ड्यूप्लेसिसवर अधिक दडपण राहील.
दिल्ली। मोहित शर्माची सुमार कामगिरी. विशेषत: जॉर्डनला सांभाळणे आवश्यक. त्याने गेल्या लढतीत ४ षटकांत ५६ धावा बहाल केल्या.


- रायुडूची अनुपस्थिती - चेन्नईचा ‘मॅच विनर’ अंबाती रायुडू या लढतीला मुकणार आहे. सीएसके संघव्यवस्थापनाने रायुडू या लढतीत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. सीएसकेच्या सीईओंनी रायुडूची दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले. रायुडूला स्नायूच्या दुखापतीचा त्रास जाणवत आहे, पण तो आणखी एका सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी जर रविचंद्रन अश्विन खांद्याच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही तर सीनिअर स्पिनर अमित मिश्रा अक्षर पटेलचा साथीदार म्हणून पर्याय ठरू शकतो.

Image

Image

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CSK vs DC Live Score Chennai Super Kings vs Delhi Capitals IPL 2020 Live Score and Match updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.