CSK vs DC Latest News : क्रिज बाहेर जाण्याआधी यष्टिंमागे कोण आहे हे लक्षात ठेवा; MS Dhoniची सुपर स्टम्पिंग

CSK vs DC Latest News : पॉवर प्लेनंतर पृथ्वी व शिखर यांनी गिअर बदलला आणि दोघांनी फटकेबाजीला सुरुवात केली. पण...

By स्वदेश घाणेकर | Published: September 25, 2020 08:56 PM2020-09-25T20:56:07+5:302020-09-25T20:56:43+5:30

whatsapp join usJoin us
CSK vs DC Latest News : Prithvi Shaw charged down the track and missed, Stumped by MS Dhoni   | CSK vs DC Latest News : क्रिज बाहेर जाण्याआधी यष्टिंमागे कोण आहे हे लक्षात ठेवा; MS Dhoniची सुपर स्टम्पिंग

CSK vs DC Latest News : क्रिज बाहेर जाण्याआधी यष्टिंमागे कोण आहे हे लक्षात ठेवा; MS Dhoniची सुपर स्टम्पिंग

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) IPL2020मधील आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. CSKने संघात एक बदल केला असून लुंगी एनगिडीच्या जागी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेझलवूड याला संधी दिली आहे. DCच्या संघातही दोन बदल पाहायला मिळाले. दुखापतग्रस्त आर अश्विनच्या जागी अमित मिश्राला,तर मोहित शर्माच्या जागी आवेश खान याला संधी दिली आहे. DC ओपनर शिखर धवन ( Shikhar Dhawan) आणि पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) यांनी पॉवर प्लेमध्ये संयमी खेळ केली. 

DC vs CSK Latest News & Live Score 

IPL 2020 : आम्हालाही तो आदर मिळायला हवा, असं नाही का वाटत? गावस्करांच्या कमेंटवर अनुष्का भडकली

पॉवर प्लेनंतर पृथ्वी व शिखर यांनी गिअर बदलला आणि दोघांनी फटकेबाजीला सुरुवात केली. पृथ्वीनं IPL2020मधील पहिले अर्धशतक 35 चेंडूत पूर्ण केले. पण 11 व्या षटकात ही जोडी पीयूष चावलानं तोडली. त्यानं धवनला ( 35) माघारी पाठवलं. पाठोपाठ चावलानं 64 धावांची खेळी करणाऱ्या पृथ्वीलाही बाद केलं. यानंतर CSKच्या गोलंदाजांनी सामन्यात कमबॅक केले. धोनीनं त्याच्या गोलंदाजांचा सुरेख वापर करताना DCच्या धावसंख्येवर लगाम लावला. 13व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर धोनीनं यष्टिमागे कमाल केली. त्यानं पृथ्वी शॉला यष्टिचीत करून माघारी जाण्यास भाग पाडले. 

पाहा व्हिडीओ...

 

महेंद्रसिंग धोनीनं केली सुरेश रैनाशी बरोबरी; दोघांच्याच नावावर आहे हा विक्रम

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात धोनीनं IPLमध्ये CSKसाठी 100वा विजय मिळवण्याचा विक्रम केला. IPLमध्ये असा विक्रम करणारा तो पहिलाच कर्णधार आहे. याशिवाय IPL इतिहासात सर्वाधिक 38 स्पम्पिंगचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. त्यानंतर दिनेश कार्तिकचा ( 30) क्रमांक येतो. IPLचे सर्वाधिक 9 फायनल त्याने खेळले आहेत.  8 वेळा CSKकडून, तर रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून एकवेळा फायनल खेळला. IPLमध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक 94 झेल व 38 स्पम्पिंग करणारा खेळाडू आहे.DC vs CSK Latest News & Live Score 

आजच्या सामन्यात त्यानं IPL मध्ये सर्वाधिक 193 सामने खेळण्याच्या सुरेश रैनाच्या विक्रमाशी बरोबरी केली. सुरेश रैनाला IPL मध्ये 200 सामना खेळणारा पहिला खेळाडू बनण्याची संधी होती, परंतु त्यानं वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली. 2008पासून धोनी CSKसोबत आहे. त्या मोसमात राजस्थान रॉयल्सनी त्यांना अंतिम सामन्यात पराभूत केले.  त्यानंतर 2009च्या मोसमात CSKला ठिकठाक कामगिरी करता आली आणि 2010मध्ये त्यांनी पहिले जेतेपद पटकावले. त्यानंतर 2011 आणि 2018मध्ये CSKनं बाजी मारली. यासह धोनीच्या नेतृत्वाखाली CSKनं 2010 व 2014चे चॅम्पियन्स लीगचे जेतेपद जिंकले. DC vs CSK Latest News & Live Score 

लॉकडाऊन मे बस....; विराट कोहली - अनुष्का शर्मा यांच्यावरील सुनील गावस्कर यांच्या कमेंटवरून वाद

IPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच नव्हे, तर यापूर्वीही MS Dhoni च्या निर्णयाचा संघाला बसलाय फटका

Web Title: CSK vs DC Latest News : Prithvi Shaw charged down the track and missed, Stumped by MS Dhoni  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.