CSK vs DC Latest News :Virender Sehwag criticizes CSK batsmen for their poor performance in the second match in a row | CSK vs DC Latest News :"पुढच्या मॅचमध्ये ग्लुकोज लावून या," सलग दोन सामने गमावणाऱ्या CSKला वीरूचा टोला

CSK vs DC Latest News :"पुढच्या मॅचमध्ये ग्लुकोज लावून या," सलग दोन सामने गमावणाऱ्या CSKला वीरूचा टोला

ठळक मुद्देसध्या चेन्नईचे फलंदाज चालत नाही आहेत. त्यामुळे पुढच्या सामन्यात त्यांना ग्लुकोज लावून आणावे लागेलचेन्नईच्या फलंदाजांना वीरेंद्र सेहवागने काढला चिमटासलग दुसऱ्या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी केली निराशा

नवी दिल्ली - आयपीएलमध्ये सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ म्हणून लौकिक असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सची यंदाच्या हंगामातील वाटचाल काहीशी अडखळती झाली आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सलामीच्या लढतीत विजय मिळवून झोकात सुरुवात करणाऱ्या धोनीच्या या संघाला नंतर झालेल्या दोन लढतीत पराभव पत्करावा लागला आहे. काल दिल्लीविरुद्ध झालेल्या लढतीत तर चेन्नईला ४४ धावांनी पराभूत व्हावे लागले होते. सलग दुसऱ्या सामन्यात चैन्नईच्या फलंदाजांनी निराशा केली. त्यावरून भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने चेन्नई सुपरकिंग्सला टीकेचे लक्ष्य केले आहे.

वीरूने गमतीदार ट्विट करत चेन्नईच्या फलंदाजांना टोला लगावला आहे. सध्या चेन्नईचे फलंदाज चालत नाही आहेत. त्यामुळे पुढच्या सामन्यात त्यांना ग्लुकोज लावून आणावे लागेल, असा चिमटा वीरेंद्र सेहवागने काढला आहे. काल दिल्लीविरुद्धच्या लढतीत १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे संघाला २० षटकांत ७ बाद १३१ धावांपर्यंतच मजल मारता आली होती. राजस्थानप्रमाणेच दिल्लीविरुद्धच्या लढतीतही चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी तळाच्या क्रमांकावर फलंदाजीस आला होता. धोनी फलंदाजीस आला तेव्हा चेन्नईच्या १६ षटकांत चार बाद ९८ धावा झाल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक षटकामागे आवश्यक धावांची संख्या प्रचंड वाढल्याने चेन्नईल आव्हानाचा पाठलाग करणे कठीण गेले.

दरम्यान, सामना संपल्यानंतर चेन्नईच्या फलंदाजांनी या लढतीत चांगली फलंदाजी केली नसल्याचे धोनीने मान्य केले. तो म्हणाला, हा सामना आमच्यासाठी चांगला झाला असे मला वाटत नाही. खेळपट्टी संथ झाली होती आणि दवसुद्धा पडला नाही. मात्र आमच्या संघाच्या फलंदाजीमध्ये दोष आहे, असे मला वाटते. तसेच आम्हाला त्यात सुधारणा करावी लागेल. त्या दृष्टीने पुढच्या सात दिवसांचा ब्रेक आमच्यासाठी चांगला ठरेल.

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ मुंबईविरुद्ध झालेल्या सलामीच्या लढतीत त्यांना विजय मिळाला आहे. तर राजस्थानविरुद्ध मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला पराभूत व्हावे लागले होते. या लढतीत खूप खालच्या क्रमांकावर फलंदाजीस आल्याने त्याच्यावर टीका झाली होती. तर काल दिल्लीविरुद्धही चेन्नईच्या फलंदाजांनी सुमार खेळ केला. आता चेन्नईचा पुढचा सामना २ ऑक्टोबर रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.

CSKसाठी गुडन्यूज! पुढील सामन्यात खेळणार हास्टार फलंदाज 

चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Superkings) संघाने शुक्रवारी Indian Premier League (IPL 2020) मध्ये सलग दुसरा पराभव पत्करला. दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांच्या फलंदाजांना नियोजनबद्ध खेळ करण्यात यश आले नाही. एकटा फाफ डूप्लेसिस सोडला, तर बाकी कोणालाही निर्धाराने खेळता आले नाही. त्यात त्यांना आपल्या अनुभवी फलंदाजाची कमतरता फार भासली. मात्र आता त्या स्टार फलंदाजाचे पुनरागमन होत असून चेन्नई आता लवकरच विजयी मार्गावर परतेल असा विश्वास चाहत्यांना आहे. गेल्या दोन सामन्यांत दुखापतीमुळे संघाबाहेर बसलेला स्टार फलंदाज अंबाती रायुडू (Ambati Rayudu) पुढील सामन्यात खेळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्लीविरुद्ध सीएसकेला रायुडूची कमतरता खूप भासली.

English summary :
Virender Sehwag criticizes CSK batsmen for their poor performance in the second match in a row

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CSK vs DC Latest News :Virender Sehwag criticizes CSK batsmen for their poor performance in the second match in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.