CSK vs DC Latest News : Faf Du Plessis, Ambati Rayudu Guide Chennai super kings to 179/4 against Delhi Capitals | CSK vs DC Latest News : ड्यू प्लेसिस, रायुडू अन् जडेजाची फटकेबाजी, चेन्नई सुपर किंग्सचा धावांचा डोंगर

CSK vs DC Latest News : ड्यू प्लेसिस, रायुडू अन् जडेजाची फटकेबाजी, चेन्नई सुपर किंग्सचा धावांचा डोंगर

करो वा मरो सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फॅफ ड्यू प्लेसिस पुन्हा एकदा CSKसाठी संकटमोचक ठरला. दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) गोलंदाजांचा त्यानं समाचार घेत अर्धशतक पूर्ण केले. शेन वॉटसन, सॅम कुरन व महेंद्रसिंग धोनी यांना आज मोठी खेळी साकारता आली नाही. अंबाती रायुडू ( Ambati Rayudu) आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांनी अर्धशतकी भागीदारी करताना CSKला समाधानकारक पल्ला गाठून दिला. 

दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) गोलंदाज तुषार देशपांडे यानं पहिल्याच चेंडूंवर CSKला धक्का दिला. सॅम कुरननं पहिलाच चेंडू सीमापार टोलवण्याचा प्रयत्न केला, परंतु अॅनरीच नॉर्ट्झेनं तो झेल टिपला. शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis) यांनी CSKला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करून दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावा जोडल्या. फॅफनं यदाच्या मोसमातील चौथे अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं ३९ चेंडूंत ५० धावा केल्या, पण पुढच्याच चेंडूवर वॉटसन त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. नॉर्ट्झेनं ३६ धावा करणाऱ्या वॉटसनला बाद केले. 

कागिसो रबाडानं CSKला मोठा धक्का दिला. १५ व्या षटकात रबाडानं अर्धशतकवीर फॅफला बाद केले. फॅफनं ४७ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५८ धावा केल्या. रबाडाची ही IPL मधील ५०वी विकेट ठरली. आयपीएलमध्ये सर्वात जलद ५० विकेट घेण्याचा विक्रम रबाडानं नावावर केला. त्यानं २७ सामन्यांत विकेट्सचे अर्धशतक साजरे केले. त्यानंतर आलेला धोनी ( ३) धावांवर माघारी परतला, परंतु रायुडू व जडेजा यांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेताना पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.

रायुडू २५ चेंडूंत १ चौकार व ४ षटकार खेचून ४५, तर जडेजा १३ चेंडूंत ४ षटकारांसह ३३ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईनं ४ बाद १७९ धावा केल्या. अॅनरिच नॉर्ट्झेनं दोन विकेट्स घेतल्या. फॅफ ड्यू प्लेसिसचा CSKकडून भारी विक्रम, त्याला बाद करून कागिसो रबाडाचा मोठा पराक्रम!

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CSK vs DC Latest News : Faf Du Plessis, Ambati Rayudu Guide Chennai super kings to 179/4 against Delhi Capitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.