Chetan Chauhan tests positive for coronavirus, family members also undergo tests | Breaking : भारताच्या माजी क्रिकेटपटूला कोरोनाची लागण; कुटुंबीयांची होणार टेस्ट!

Breaking : भारताच्या माजी क्रिकेटपटूला कोरोनाची लागण; कुटुंबीयांची होणार टेस्ट!

ठळक मुद्देभारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू चेतन चौहान यांना कोरोना झाला आहे.

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांच्या पाठोपाठ आणखी एका दिग्गज व्यक्तीला कोरोना झाल्याचे वृत्त आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू चेतन चौहान यांना कोरोना झाला आहे. शुक्रवारी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर आज ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.

चौहान यांच्या कुटुंबीयाची कोरोना चाचणी होणार असून सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. चौहान यांना लखनौ येथील संजय गांधी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

1969 मध्ये त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी भारताकडून ४० कसोटी आणि ७ वन डे सामने खेळले आहेत. महाराष्ट्र आणि दिल्ली रणजी संघाचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. १९८१ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Chetan Chauhan tests positive for coronavirus, family members also undergo tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.