Cheerleaders give up big earnings in IPL for two years! | चीअरलीडर्स दोन वर्षे आयपीएलमधील मोठ्या कमाईला मुकल्या!

चीअरलीडर्स दोन वर्षे आयपीएलमधील मोठ्या कमाईला मुकल्या!

ठळक मुद्देखेळातील चढ-उतार पाहताना प्रेक्षकांना चार तास भुरळ पडायची ती थिरकणाऱ्या चीअरलीडर्सची. विदेशातून आलेल्या या मुली स्वत:च्या सौंदर्याचे, नृत्याचे दर्शन घडवून लक्ष वेधून घ्यायच्या.

नवी दिल्ली : २०२१ च्या आयपीएलला २९ सामन्यांनंतर कोरोनाने रोखले. विविध संघांतील खेळाडू आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण होताच पुढील ३१ सामने अनिश्चत काळासाठी स्थगित करण्यात आले. मागच्या वर्षीही कोरोनामुळे आयपीएलचे १३ वे पर्व यूएईत आयोजित करण्यात आले होते. लीग स्थगित झाल्याचा फटका खेळाडू, अधिकारी, संबंधित फ्रँचायजी आणि हितधारकांना बसलाच, शिवाय मागच्या दोन वर्षांपासून चीअरलीडर्सचेदेखील नुकसान झाले आहे.

खेळातील चढ-उतार पाहताना प्रेक्षकांना चार तास भुरळ पडायची ती थिरकणाऱ्या चीअरलीडर्सची. विदेशातून आलेल्या या मुली स्वत:च्या सौंदर्याचे, नृत्याचे दर्शन घडवून लक्ष वेधून घ्यायच्या. प्रेक्षकांना मैदानात प्रवेश नसल्याने त्यांनाही मागणी घटली. दोन वर्षांत त्यांचेही उत्पन्न बुडाले. आयपीएलदरम्यान या चीअर लीडर्सना किती वेतन आणि इतर भत्ते दिले जातात हे २०१४ च्या पर्वात सर्वप्रथम पुढे आले. 
एका चीअरलीडर्सची आयपीएलच्या सत्रातील कमाई जवळपास २० लाख रुपये इतकी असते, हे सूत्रांनी सांगितले आहे.
मैदानातील नाचगाणे आटोपल्यानंतर रात्री हॉटेलमध्ये होणाऱ्या फ्रँचायजींच्या पार्ट्या, फोटो शूट, आदींसाठी त्यांना वेगळे मानधन दिले जाते. चौकार आणि षटकारांवर नृत्य करणाऱ्या या मुलींना एखादा संघ जिंकल्यानंतर काही बक्षीस रक्कमही मिळते. तथापि, कोरोनामुळे त्यांच्या या कमाईला ब्रेक लागला. प्रत्येक चीअरलीडरला एका सामन्यासाठी पाचशे डॉलर दिले जातात. त्यांचे वार्षिक वेतन १५ हजार डॉलर इतके असते. याशिवाय एका पार्टीसाठी २५०० डॉलर इतका भत्ता दिला जातो. आयपीएलमधील १४ सामन्यांतील त्यांची एकत्रित कमाई लक्षात घेतल्यास सीझनमध्ये जवळपास २० लाख रुपये मिळत होते.

चीअरलीडर्सची कमाई
n केकेआर आणि आरसीबी : प्रत्येक सामन्यासाठी ३७ हजार(एकूण १४ सामने),पार्टीसाठी एक लाख ८५ हजार तसेच वार्षीक वेतन ११लाख १० हजार. एकूण: जवळपास २० लाख.
n मुंबई इंडियन्स, सीएसके आणि पंजाब किंग्स : प्रत्येक सामन्यासाठी ३७ हजार(एकूण १४ सामने),पार्टीसाठी एक लाख ८५ हजार तसेच वार्षिक वेतन ९ लाख २५ हजार.
 

n राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद : प्रत्येक सामन्यासाठी २६ हजार ९००(एकूण १४ सामने),पार्टीसाठी एक लाख ८५ हजार तसेच वार्षिक वेतन ५ लाख ५५ हजार.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Cheerleaders give up big earnings in IPL for two years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.