India vs Australia : 'ही ट्वेंटी-20 लढत नाही!', विराट कोहलीच्या नेतृत्वावर गौतम गंभीरची टीका

या सामन्यानंतर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) यानं कर्णधार विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वावर टीका केली.

By स्वदेश घाणेकर | Published: November 30, 2020 10:27 AM2020-11-30T10:27:55+5:302020-11-30T10:28:13+5:30

whatsapp join usJoin us
'Can’t understand the captaincy' - Gambhir lashes out at Kohli after India's ODI series loss to Australia | India vs Australia : 'ही ट्वेंटी-20 लढत नाही!', विराट कोहलीच्या नेतृत्वावर गौतम गंभीरची टीका

India vs Australia : 'ही ट्वेंटी-20 लढत नाही!', विराट कोहलीच्या नेतृत्वावर गौतम गंभीरची टीका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia : पहिल्या वन डे सामन्यात ६६ धावांनी पराभव पत्करल्यानंतर टीम इंडियाकडून दमदार कमबॅकची अपेक्षा फोल ठरली. ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या वन डेत ५१ धावांनी विजय मिळवून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.  स्टीव्हन स्मिथची ( १०४) शतकी खेळी अन् फिंच ( ६०), वॉर्नर ( ८३), मार्नस लाबुशेन ( ७०) व ग्लेन मॅक्सवेलच्या ( ६३*) अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं ४ बाद ३८९ धावांचा डोंगर उभा केला. भारताविरुद्धची ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरात टीम इंडियाला ९ बाद ३३८ धावा करता आल्या. विराट कोहली ( ८९) आणि लोकेश राहुल ( ७६) यांच्याव्यतिरिक्त अन्य खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. 

या सामन्यानंतर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) यानं कर्णधार विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वावर टीका केली.  ESPNCricinfo’s post-match showमध्ये बोलताना गंभीर म्हणाला,''विराट कोहलीचे निर्णय मला कळलेच नाही. स्ट्राँग बॅटिंग लाईन अप असलेल्या प्रतिस्पर्धी संघाला विकेट घेत धक्के देत राहणे गरजेचे आहे, हे आपण वारंवार बोलत आहोत. पण, तुम्ही तुमच्या प्रमुख गोलंदाजाकडून दोन षटकांची स्पेल करून घेता. वन डे क्रिकेटमध्ये साधारणता ४-३-३अशा तीन स्पेल टाकल्या जातात, परंतु प्रमुख गोलंदाजाला दोन षटकानंतर थांबवले जाते. अशी नेतृत्व समजण्यापलीकडे आहे. ही ट्वेंटी-20 क्रिकेट नाही. खराब नेतृत्वामागचं मी कारणही समजावून सांगू शकत नाही.'' डेव्हिड वॉर्नरची दुखापत गंभीर?; वन डे अन् ट्वेंटी-20 मालिकेतून घेतली माघार!

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यानंही सामन्यानंतर हाच मुद्दा मांडला.  भारताला सहाव्या गोलंदाजाची उणीव जाणवत आहे, याच मुद्यावर गंभीरनं काही नावं सुचवली. ''वॉशिंग्टन सुंदर किंवा शिवम दुबे किंवा अन्य कोणता तरी पर्याय ठेवायला हवा होता. पण, यापैकी एकही पर्याय न ठेवणे, ही निवड प्रक्रियेची चूक आहे. एखाद्या खेळाडूची कामगिरी तपासण्यासाठी त्याला संधी द्यायला हवी. भारतीय संघानं तसे करणे योग्य समजले नाही आणि त्याचा फटका संघाला बसत आहे,''असेही गंभीर म्हणाला.  

Web Title: 'Can’t understand the captaincy' - Gambhir lashes out at Kohli after India's ODI series loss to Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.