England vs Ireland 2nd ODI: 21वर्षीय कर्टीस कॅम्फरचा पराक्रम; आयर्लंडनं दिली इंग्लंडला टक्कर

England vs Ireland 2nd ODI: कर्टीस कॅम्फरनं इंग्लंडच्या गोलंदाजांचा घेतला समाचार...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 10:04 PM2020-08-01T22:04:39+5:302020-08-01T22:06:26+5:30

whatsapp join usJoin us
Campher became a first Irish player to post 50+ scores in his first two ODI, Ireland set 213 runs target to England in 2nd ODI | England vs Ireland 2nd ODI: 21वर्षीय कर्टीस कॅम्फरचा पराक्रम; आयर्लंडनं दिली इंग्लंडला टक्कर

England vs Ireland 2nd ODI: 21वर्षीय कर्टीस कॅम्फरचा पराक्रम; आयर्लंडनं दिली इंग्लंडला टक्कर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England vs Ireland 2nd ODI: इंग्लंड विरुद्ध आयर्लंड यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यातही इंग्लंडची बाजू वरचढ दिसत आहे. नाणेफेक जिंकून आयर्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यातील अपयशानंतर आयर्लंडच्या आघाडीच्या फळीकडून चांगल्या खेळाची अपेक्षा होती, परंतु इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्यांना यश मिळवू दिले नाही. पहिल्या सामन्यात पाच विकेट्स घेणाऱ्या डेव्हीड विलीनं इंग्लंडला विकेटचे खाते उघडून दिले. त्यानंतर फिरकीपटू आदील रशीदनं आयर्लंडला धक्के दिले. या सामन्यात कर्टीस कॅम्फर पुन्हा एकदा आयर्लंडसाठी तारणहार ठरला. त्यानं एका वेगळ्याच पराक्रमाला गवसणी घातूल इंग्लंडसमोर तगडं आव्हान उभं केलं. 

पाचव्या षटकात विलीनं आयर्लंडचा सलामीवीर गॅरेथ डेनली ( 0) याला माघारी पाठवले. त्यानंतर पॉल स्ट्रीलिंगला ( 12) बाद करून विलीनं आयर्लंडला मोठा धक्का दिला. जेम्स व्हिन्सनं आयर्लंडचा कर्णधार अँडी बॅलबीर्नी ( 15) ची विकेट घेतली. त्यानंतर रशीदनं आयर्लंडला तीन धक्के दिले. हॅरी टेक्टरची विकेट घेऊन रशीदनं नावावर विक्रम नोंदवला. रशीदनं 10 षटकांत 34 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून वन डे क्रिकेटमध्ये 150 विकेट्स घेणारा तो पहिलाच फिरकीपटू ठरला.  


पहिल्या सामन्य़ात अर्धशतकी खेळी करणाऱ्या कर्टीस कॅम्फरनं आयर्लंडला याही सामन्यात आधार दिला. त्यानं सातव्या विकेटसाठी सिमी सिंगसह अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर कर्टीस आणि अँडी मॅकब्रीन यांनी फटकेबाजी करताना अर्धशतकी भागीदारी करून संघाला दोनशे धावांचा पल्ला पार करून दिला.  पहिल्या दोन आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यांत शतक झळकावणारा कर्टीस हा आयर्लंडचा पहिलाच खेळाडू ठरला. या सामन्यात त्यानं 87 चेंडूंत 8 चौकारांसह 68 धावा केल्या. आयर्लंडनं 50 षटकांत 9 बाद 212 धावा केल्या. 

Web Title: Campher became a first Irish player to post 50+ scores in his first two ODI, Ireland set 213 runs target to England in 2nd ODI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.