BREAKING: West Indies Dwayne Bravo makes himself available for selection in the T20 side ahead of World T20 next year | Breaking : वेस्ट इंडिजच्या 'चॅम्पियन'चा निवृत्तीचा निर्णय मागे; ट्वेंटी-20 वर्ल्ड कप मध्ये खेळण्याची इच्छा
Breaking : वेस्ट इंडिजच्या 'चॅम्पियन'चा निवृत्तीचा निर्णय मागे; ट्वेंटी-20 वर्ल्ड कप मध्ये खेळण्याची इच्छा

वेस्ट इंडिज संघाला ट्वेंटी-20 मालिकेत टीम इंडियाकडून पराभव पत्करावा लागला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपची पूर्वतयारी म्हणून या ट्वेंटी-20 मालिकेकडे पाहिले जात होते. या मालिकेत विंडीजच्या खेळाडूंना अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नसली तरी त्यांचा खेळ पाहून अन्य प्रतिस्पर्धींच्या मनात धडकी नक्की भरली असेल. त्यात वेस्ट इंडिजसाठी एक मोठी गोड बातमी समोर आली आहे. वेस्ट इंडिजच्या चॅम्पियन खेळाडूनं निवृत्तीचा निर्णय मागे घेतला असून आगामी ट्वेंटी-20 मालिकेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Sportstar नं दिलेल्या वृत्तानुसार वेस्ट इंडिजचा ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होनं निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. ब्राव्होनं ऑक्टोबर 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण, आता त्यानं आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या निवडीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. ब्राव्हो जगभरातील विविध व्यावसायिक लीगमध्ये खेळत आहे. त्यानं विंडीजकडून सप्टेंबर 2016 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामना खेळला होता. त्यानं 40 कसोटीत 2200 धावा आणि 86 विकेट्स घेतल्या आहेत. वन डेत 164 सामन्यांत त्याच्या नावावर 2968 धावा आणि 199 विकेट्स आहेत, तर 66 ट्वेंटी-20 सामन्यांत 1142 धावा व 52 विकेट्स आहेत.

तो म्हणाला,''प्रशिक्षक फिल सिमोन्स आणि कर्णधार किरॉन पोलार्ड यांच्या नेतृत्वाखाली खेळण्यास मी इच्छुक आहे. त्यामुळे आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करत असल्याची घोषणा करत आहे.'' 

ड्वेन ब्राव्होने केलं बॉलीवूडच्या अभिनेत्रीला प्रपोज, ती म्हणाली...
ड्वेन ब्राव्हो हा नेहमीच चर्चेत असतो. आपल्या दमदार खेळाबरोबर डान्ससाठीही तो प्रसिद्ध आहे. त्याबरोबर त्याने बॉलीवूडसाठी काही गाणीही गायली आहेत. काही दिवसांपूर्वी ब्राव्हो हा बॉलीवूडमध्ये एंट्री करणार असल्याच्याही बातम्या आल्या होत्या. पण आता तर ब्राव्होने बॉलीवूडच्या अभिनेत्रीला प्रपोज केल्याचे समजत आहे.

काही दिवसांपूर्वी ब्राव्हो आणि बॉलीवूडमधील सनी लिओनी यांचा एक डान्सचा व्हिडीओ चांगलाच वायर झाला होता. त्यानंतर एका गाण्यासाठी ब्राव्हो आणि एक बॉलीवूडची अभिनेत्री भेटली होती. या भेटीमध्ये ब्राव्होने हे प्रपोज केल्याचे समजत आहे. ब्राव्होने या अभिनेत्रीला प्रपोज केल्यावर तिने पहिला प्रश्न विचारला की, आपण लग्न कुठे करायचं. याचं सुंदर उत्तर ब्राव्होने दिलं आहे. ब्राव्होने आपण स्टेडियममध्ये लग्न करायचं, असं तिला सांगितलं. त्याचबरोबर आपलं लग्न आयपीएलच्या उद्धाटन सोहळ्यासारखे भव्य दिव्य असणार आणि त्यामध्ये चीअरलीडर्स डान्सही करणार असल्याचे ब्राव्होने सांगितले. आता ब्राव्होने नेमक्या कोणत्या बॉलीवूडच्या अभिनेत्रीला प्रपोज केले, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या अभिनेत्रीने यारिया (2014), इरादा (2017) आणि वीकेंड्स (2018) या सिनेमांमध्ये काम केले आहे. ही अभिनेत्री आहे राधिका बांगिया...
 

Web Title: BREAKING: West Indies Dwayne Bravo makes himself available for selection in the T20 side ahead of World T20 next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.