Breaking : विराट कोहलीसह टीम इंडियाचे सहा शिलेदार Asia XI vs World XI सामना खेळणार

शेख मुजीबूर रहमान यांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त बांगलादेश क्रिकेट मंडळ ( बीसीबी) Asia XI vs World XI यांच्यात दोन ट्वेंटी-20 सामन्यांच्या आयोजन करणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 03:29 PM2020-02-25T15:29:01+5:302020-02-25T15:34:27+5:30

whatsapp join usJoin us
Breaking : BCB announces Asia XI squad to face World XI in T20I series, Including Virat Kohli 6 Indians Players will take a part svg | Breaking : विराट कोहलीसह टीम इंडियाचे सहा शिलेदार Asia XI vs World XI सामना खेळणार

Breaking : विराट कोहलीसह टीम इंडियाचे सहा शिलेदार Asia XI vs World XI सामना खेळणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

शेख मुजीबूर रहमान यांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त बांगलादेश क्रिकेट मंडळ ( बीसीबी) Asia XI vs World XI यांच्यात दोन ट्वेंटी-20 सामन्यांच्या आयोजन करणार आहे. बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून शेख मुजीबूर रहमान ओळखले जातात. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त 18 आणि 21 मार्चला ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर ट्वेंटी-20 सामने खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह सहा भारतीय खेळाडू आशिया एकादश संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. बांगलादेश क्रिकेट मंडळानं ( बीसीबी) मंगळवारी ही घोषणा केली.

पाकिस्तानी खेळाडू नाहीच...

पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) त्यांच्या खेळाडूंच्या व्यग्र वेळापत्रकामुळे या सामन्यात ते खेळणार नसल्याचे सांगितले आहे. ''जागतिक एकादश आणि आशिया एकादश यांच्यातले ट्वेंटी-20 सामने 16 ते 20 मार्च या कालावधीत होणार आहेत. या दरम्यान पाकिस्तान सूपर लीगही आहे आणि त्याचा अंतिम सामना 22 मार्चला होणार आहे. त्यामुळे दोन्ही स्पर्धांच्या तारखा बदलणे शक्य नाही. त्यामुळे आमचे खेळाडू खेळणार नसल्याचे आम्ही बीसीबीला कळवले आहे. त्यांनी आमची अडचण समजून घेतली आहे,'' असे पीसीबीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. 

भारताचे सहा खेळाडू
या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीसहलोकेश राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव हे खेळणार आहेत. पण, विराट आणि लोकेश एकच सामना खेळणार आहेत. विराटकडून तसा अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 

आशिया एकादश संघ

लोकेश राहुल *, रिषभ पंत, विराट कोहली*, शिखर धवन, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, लिटन दास, टी इक्बाल, मुश्फीकर रहीम, थिसारा परेरा, रशीद खान, मुस्ताफीजून रहमान, संदीप लामिछाने, लसिथ मलिंगा, मुजीब उर रेहमान
( * केलेले खेळाडू एक सामना खेळणार आहेत, विराटच्या समावेशाबाबत अजूनही अधिकृत दुजोरा नाही) 

Web Title: Breaking : BCB announces Asia XI squad to face World XI in T20I series, Including Virat Kohli 6 Indians Players will take a part svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.