Bravo withdraws due to injury, adds to CSK's woes | ब्राव्होची दुखापतीमुळे माघार, सीएसकेच्या अडचणीत भर

ब्राव्होची दुखापतीमुळे माघार, सीएसकेच्या अडचणीत भर

दुबई : आयपीएलच्या तेराव्या पर्वात चेन्नई सुपरकिंग्ज संघापुढील अडचणी काही केल्या कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. सततच्या पराभवांमुळे गुणतालिकेत तळाच्या स्थानावर फेकल्या गेलेल्या चेन्नईला आणखी धक्का बसला आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली असून तो लवकरच आपल्या घरी जाणार आहे. चेन्नईचे आव्हान जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे. 

दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध सामन्यात खेळत असताना ब्राव्होला दुखापत झाली होती. यानंतर चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात ब्राव्होला विश्रांती दिली. मात्र दुखापतीचे गंभीर स्वरूप पाहता ब्राव्होने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून तो लवकरच आपल्या घरी जाणार असल्याचे विश्वनाथन यांनी सांगितले. एरवी नेहमी अंतिम फेरीच्या शर्यतीत असणारा चेन्नई संघ यंदा चांगलाच संकटात सापडला.

स्पर्धेला सुरुवात होण्याआधी रैना-हरभजन यांनी घेतलेली माघार, खेळाडूंना झालेली कोरोनाची लागण, स्पर्धेदरम्यान प्रमुख खेळाडूंचे दुखापतग्रस्त होणे यामुळे हा संघ   लौकिकाला साजेसा खेळ करू शकला नाही. त्यातच ब्राव्होच्या जाण्यामुळे चेन्नईला जबर धक्का बसला. ब्राव्हो यंदा सहा सामने खेळला. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bravo withdraws due to injury, adds to CSK's woes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.