नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याने आॅफ स्पिनर हरभजनसिंग याच्याबाबत खुलासा केला. ‘२००७-०८ च्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात‘मंकीगेट’ प्रकरण घडले.यात भज्जीची देखील चूक होती आणि ड्रेसिंगरुममध्ये ही गोष्ट अनेकजण मान्य करीत होते,’असे कुंबळेने सांगितले. जानेवारी २००८च्या सिडनी कसोटीत ‘मंकी गेट’ प्रकरण घडले. त्यावेळी आॅफस्पिनर हरभजनसिंग याच्यावर अॅन्ड्रयू सायमंड याच्याविरुद्ध वर्णद्वेषी शेरेबाजी केल्याच्या आरोपाखाली आयसीसीने तीन सामन्यांची बंदी घातली होती.