‘Bhai mujhe Sreesanth nahi banna’ – Navdeep Saini’s 7-year-old comment goes viral on social media | भाई मुझे श्रीसंत नही बनना!; नवदीप सैनीची सोशल मीडियावरील ७ वर्षांपूर्वीची पोस्ट व्हायरल

भाई मुझे श्रीसंत नही बनना!; नवदीप सैनीची सोशल मीडियावरील ७ वर्षांपूर्वीची पोस्ट व्हायरल

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज नवदीप सैनी ( Navdeep Saini) यानं मागील काही वर्षांत क्रिकेट वर्तुळात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जगातील सर्वोत्तम फलंदाजांना त्यानं अनेकदा अडचणीतही आणले आहे. त्यानं आतापर्यंत २ कसोटी, ७ वन डे आणि १० ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ऐतिहासिक कसोटी मालिकेतील विजयात त्याचाही हातभार होता.  महेंद्रसिंग धोनीनं मोडले कोरोना नियम?; चाहत्यांची तौबा गर्दी, पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज

पण, नवदीप सैनी सध्या वेगळ्याच पोस्टमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्यानं ७ वर्षांपूर्वी केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. ४ जून २०१३मध्ये त्यानं ही पोस्ट केली होती. या पोस्टमधील फोटोत तो चषकासह उभा असलेला दिसत आहेत. चाहतेही त्याचं कौतुक करत आहे आणि एकानं तर चक्क त्याला ज्युनियर श्रीसंत (Junior Sreesanth) असे म्हटले. त्याला रिप्लाय देताना नवदीपनं, भाई मुझे नही बनना श्रीसंत, मुझे ब्रेट ली बनना है. असा रिप्लाय दिला. 


२०१३च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये श्रीसंत, अंजित चंडीला आणि अंकित चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. श्रीसंतनं बंदीचा कालावधी पूर्ण करून पुन्हा मैदानावर पुनरागमन केलं आहे. केरळकडून तो सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 आणि विजय हजारे चषक स्पर्धेतही खेळला.  
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ‘Bhai mujhe Sreesanth nahi banna’ – Navdeep Saini’s 7-year-old comment goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.