Beware! If you search Sunny Leone and MS Dhoni on the internet ... | खबरदार! सनी लिओनी आणि महेंद्रसिंग धोनीला इंटरनेटवर सर्च कराल तर...
खबरदार! सनी लिओनी आणि महेंद्रसिंग धोनीला इंटरनेटवर सर्च कराल तर...

मुंबई : आपण सारेच दिवसभर इंटरनेटवर असतो. आपल्या आवडणाऱ्या सेलिब्रेटींची नावं आपण इंटरनेटवर सर्च करतो. पण जर तुम्ही बॉलीवूड सेलिब्रेटी सनी लिओनी आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या नावाने इंटरनेटवर सर्च करत असाल तर सावधान, कारण तुमची पर्सनल माहिती चोरी होऊ शकते.

धोनीने भारताला दोन विश्वचषक जिंकवून दिले आहेत. पण जर इंटरनेटवर तुम्ही धोनीच्या नावाने सर्च करत असाल तर तुमच्यासाठी मोठी समस्या उभी राहू शकते. कारण धोनीच्या नावे सर्च दिल्यावर तुमची खासगी माहिती चोरीला जाऊ शकते. कारण धोनीचे नाव मॅफकेच्या मोस्ट डेंजरस सेलिब्रिटीजच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या सेलिब्रेटींच्या प्रसिद्धीचा फायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याचे आता समोर आले आहे.

सेलिब्रेटींच्या प्रसिद्धीचा फायदा सध्याच्या घडीला सायबर गुन्हेगार घेताना दिसत आहेत. हे गुन्हेगार चाहत्यांना अमिष दाखवतात आणि वायरसचा वापर करून त्यांची माहिती चोरी करतात.

याबाबत मॅफके इंडियाचे उपाध्यक्ष आणि कार्यकारी संचालक वेंकट कृष्णापूर यांनी सांगितले की, " चाहते आपल्या लाडक्या सेलिब्रेटीच्या बऱ्याच गोष्टी इंटरनेटवर सर्च करत असतात. सायबर गुन्हेगार या गोष्टींचा फायदा उचलण्यासाठी तयार असतात. त्यामुळे चाहत्यांनी इंटरनेटवर सर्च करताना सतर्क राहायला हवे."

टॉप 10 मोस्ट डेंजरस सेलिब्रेटीज
1. एमएस धोनी
2. सचिन तेंडुलकर
3. गौतम गुलाटी
4. सनी लियोनी
5. बादशाह
6. राधिका आपटे
7. श्रद्धा कपूर
8. हरमनप्रीत कौर
9. पी.व्ही. सिंधु
10. ख्रिस्तियानो रोनाल्डो

Web Title: Beware! If you search Sunny Leone and MS Dhoni on the internet ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.