बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणात RCB मार्केटिंग प्रमुखासह चौघांना जामीन मंजूर; पण...

बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणातील अटकेत असलेल्या चौघांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 19:23 IST2025-06-12T19:21:05+5:302025-06-12T19:23:17+5:30

whatsapp join usJoin us
Bengaluru Stampede Case RCB Marketing Head Nikhil Sosale And 3 Others Get Bail Karnataka High Court Issues Orders | बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणात RCB मार्केटिंग प्रमुखासह चौघांना जामीन मंजूर; पण...

बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणात RCB मार्केटिंग प्रमुखासह चौघांना जामीन मंजूर; पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Bengaluru Stampede Case : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने IPL ट्रॉफी जिंकल्यावर बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील विजयी जल्लोष ११ जणांच्या जीवावर बेतला. RCB च्या ताफ्यातील चॅम्पियन संघातील खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी ४ जूनला शहरात चाहत्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. यादरम्यान झालेल्या चेंगचेंगरीच्या दुर्घटनेत काही चाहत्यांवर जीव गमावण्याची वेळ आली. या प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी गुन्हा दाखल करत RCB चे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे यांच्यासह चौघांवर अटकेची कारवाई केली होती. संबंधित अटकेविरोधातील याचिकेवर  कर्नाटक उच्च न्यायालयाने सुनावणी केली.  या प्रकरणात चौघांना  जामीन मंजूर करण्यात आला आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणातील अटकेत असलेल्या चौघांना दिलासा

RCB चे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे यांनी कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अटकेच्या विरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही अटक ही मुलूभूत अधिकारांचे उल्लंघन असून राजकीय दबावामुळे अटकेची कारवाई करण्यात आलीये, असा युक्तीवाद निखिल सोसाळे यांच्या वकिलाने उच्च न्यायालयात केला होता. यावर  सुनावणी करताना न्यायालयाने निखिल सोसाळे यांच्यासह सुनील मॅथ्यू, किरण कुमार एस आणि इवेंट आयोजक कंपनी 'डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड'चे शमंत एनपी माविनाकेरे यांना जामीन मंजूर केला आहे. ६ जूनला पोलिसांनी या चौघांना अटक केली होती.

'अख्ख्या जगाला बोलवलं, एक तास आधी पत्र दिलं..'; कर्नाटक सरकारने RCB-BCCI वर फोडलं खापर

जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने दिले हे आदेश

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस.आर. कृष्ण कुमार यांनी ११ जूनला निखिल सोसाळे यांच्या याचिकेवरील युक्तिवादानंतर आपला निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाने बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणात न्यायालयित कोठडीत असलेल्या चौघांनाही जामीन मंजूर केला आहे. पण त्यांना पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत. 
 

Web Title: Bengaluru Stampede Case RCB Marketing Head Nikhil Sosale And 3 Others Get Bail Karnataka High Court Issues Orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.