...म्हणून बेन स्टोक्स काहीकाळ राहणार खेळापासून दूर, कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 09:46 AM2021-07-31T09:46:51+5:302021-07-31T09:47:38+5:30

Ben Stokes News: भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्यास काही दिवस शिल्लक असताना इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.

Ben Stokes will be out of the game for a while | ...म्हणून बेन स्टोक्स काहीकाळ राहणार खेळापासून दूर, कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का

...म्हणून बेन स्टोक्स काहीकाळ राहणार खेळापासून दूर, कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का

Next

लंडन : भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्यास काही दिवस शिल्लक असताना इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने काही काळासाठी क्रिकेटपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्टोक्सने काही काळापर्यंत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून स्वत:ला वेगळे केले आहे.
शुक्रवारी इंग्लंड क्रिकेट संघाला ही धक्कादायक माहिती मिळाली. स्टोक्सने वैयक्तिक कारणामुळे भारताविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली. सध्या आपण क्रिकेटच्या कोणत्याही सामन्यासाठी उपलब्ध राहू शकणार नसल्याचेही त्याने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डला (ईसीबी) कळवले. कोरोना महामारीदरम्यान सर्वच क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना बायो बबलमध्ये ठेवत आहेत. मात्र याचा खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होताना दिसत आहे. यामुळेच स्टोक्सने काहीवेळ ब्रेक घेतल्याचे म्हटले जात आहे. आयसीसीनेही स्टोक्सने ब्रेक घेतल्याच्या निर्णयाची माहिती दिली. ईसीबीने स्टोक्सचा हा निर्णय धाडसी असल्याचे म्हटले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ben Stokes will be out of the game for a while

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app