Ban bouncers for under-18 players; If you get a head injury at a young age ... | अंडर-१८ खेळाडूंसाठी बाऊन्सरवर बंदी घाला; कमी वयात डोक्याला दुखापत झाली तर...

अंडर-१८ खेळाडूंसाठी बाऊन्सरवर बंदी घाला; कमी वयात डोक्याला दुखापत झाली तर...

लंडन : कनकशन (डोक्याला दुखापत झाल्यामुळे बेशुद्ध झाल्यासारखी अवस्था) प्रकरणातील स्पेशालिस्टने क्रिकेट अधिकाऱ्यांना १८ वर्षांखालील खेळाडूंविरुद्ध बाऊन्सरचा वापर करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली. त्यामुळे प्रदीर्घ काळ निर्माण होणाऱ्या समस्यांवर मर्यादा आणता येईल.

दरम्यान, नियम बनविणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) गोलंदाजांना आखुड टप्प्याच्या चेंडू टाकण्याच्या परवानगीवर चर्चा व विचारप्रक्रिया सुरू केली आहे. डोक्याला झालेल्या दुखापतीसोबत जुळलेल्या आंतरराष्ट्रीय शोध संस्थेचे मीडिया संचालक मायकल टर्नर यांनी ब्रिटेनच्या एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, ‘ज्यावेळी तुम्ही युवा अवस्थेतून प्रौढ होता त्यावेळी तुमच्या मेंदूचाही विकास होत असतो आणि अशा स्थितीत तुम्ही कनकशनपासून बचाव करण्यास प्रयत्नशील असाल. आपण कुठल्याही वयात कनकशनपासून बचाव करण्यासाठी प्रयत्नशील राहाल; पण युवासाठी ही धोकादायक बाब आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘या वयोगटातील (किशोर) खेळाडूंचा कनकशनपासून बचाव करण्यासाठी नियमांमध्ये बदल करणे सुनिश्चित करायला हवे. याचा अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करायला हवा.’ टर्नर म्हणाले, हेल्मेट केवळ फ्रॅक्चरपासून बचाव करते, कनकशनपासून नाही.
त्यांनी इशारा दिला आहे की, कमी वयात खेळाडूंच्या डोक्याला दुखापत झाली तर प्रदीर्घकालिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
ते म्हणाले, ‘युवांच्या मेंदूवर याचा जास्त गंभीर व दीर्घकालिक परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण या कालावधीत तुमच्या मेंदूचाही विकास होत असतो. टर्नर यांनी सल्ला दिला आहे की, सिनिअर क्रिकेटपटूंसह स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १८ वर्षांखालील खेळाडूंच्या आई-वडिलांना याची कल्पना असायला हवी. त्यासाठी त्यांची परवानगी मिळवायला हवी.

हेल्मेट केवळ फ्रॅक्चरपासून बचाव करते, कनकशनपासून नाही
‘हेल्मेट केवळ डोक्याचा फ्रॅक्चरपासून बचाव करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. कनकशन रोखण्यासाठी नाही. त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी केवळ एकच मार्ग आहे तो म्हणजे जर आवश्यक असेल तर नियमांमध्ये बदल होणे गरजेचे आहे.’- मायकल टर्नर 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ban bouncers for under-18 players; If you get a head injury at a young age ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.