Australia Fire : युवराज सिंग- अ‍ॅडम गिलख्रिस्ट एकाच संघात, ब्रेट ली-वासीम अक्रमचा करणार सामना

Australia Fire : ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या आगीत अनेक वन्यजीवांना आपले प्राण गमवावे लागले, तर निसर्गाचीही प्रचंड हानी झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 03:07 PM2020-02-06T15:07:56+5:302020-02-06T15:11:32+5:30

whatsapp join usJoin us
Australia Fire : The two XIs for the Bushfire Cricket Bash have been announced, Adam Gilchrist and Yuvraj Singh in same team | Australia Fire : युवराज सिंग- अ‍ॅडम गिलख्रिस्ट एकाच संघात, ब्रेट ली-वासीम अक्रमचा करणार सामना

Australia Fire : युवराज सिंग- अ‍ॅडम गिलख्रिस्ट एकाच संघात, ब्रेट ली-वासीम अक्रमचा करणार सामना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या आगीत अनेक वन्यजीवांना आपले प्राण गमवावे लागले, तर निसर्गाचीही प्रचंड हानी झाली. या आगीतून ऑस्ट्रेलिया आता कुठे सावरू लागली आहे, पण आता त्यांना आणखी एका नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आगीने नेस्तानाबुत झालेलं  शहर आणि जंगल पुन्हा उभारण्यासाठी आता ऑस्ट्रेलियाला मदत करण्यासाठी अनेक हात सरसावले आहेत. ऑस्ट्रेलियन दिग्गज गोलंदाज शेन वॉर्ननं त्याची ग्रीन कॅपचा लिलाव करून जवळपास 4.9 कोटी रक्कम जमा केले. इतकेच नव्हे तर वॉर्न आणि माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांनी निधी गोळा करण्यासाठी एका क्रिकेट सामन्याचे आयोजन केले आहे.  

हा सामना येत्या शनिवारी सिडनी येथे होणार होता, परंतु पावसाच्या शक्यतेमुळे तो आता मेलबर्न येथे होणार आहे. या सामन्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकरचेही योगदान लाभणार आहे. पण, तेंडुलकर फलंदाज म्हणून नव्हे, तर नव्या भूमिकेत सहभाग घेत ऑस्ट्रेलिया आगीतील पुनर्वसनासाठी मदत करणार आहे. 8 फेब्रुवारीला होणाऱ्या या सामन्यात  तेंडुलकर आणि वेस्ट इंडिडचा महान गोलंदाज कर्टनी वॉल्श हे अनुक्रमे पाँटिंग एकादश आणि वॉर्न एकादश संघाच्या प्रशिक्षकपदी दिसणार आहेत. पण, आता वॉल्श केवळ प्रशिक्षकाच्या नव्हे तर खेळाडूच्या भूमिकेतही दिसणार आहे. 

दिग्गज खेळाडूंच्या या यादीत वेस्ट इंडियचा महान फलंदाज ब्रायन लारा याच्याही नावाचा समावेश आहे. त्याच्यासह मॅथ्यू हेडन, जस्टीन लँगर आणि रिकी पाँटिंग यांची फटकेबाजी पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठीचा अंतिम अकरा खेळाडू आज जाहीर करण्यात आले. पाँटिंग कर्णधार असलेल्या संघात ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिसे व्हिलानी हिचाही समावेश आहे. वासीम अक्रम, ब्रेट ली, ब्रॅड हॅडीन, डॅन ख्रिस्टीयन आणि ल्युक हॉज हेही पाँटिंगच्या संघातून खेळणार आहेत. त्यांचा सामना गिलख्रिस्टच्या संघाशी होईल. शेन वॉर्नला या सामन्याचा सदस्य होता येणार नसल्यानं गिलख्रिस्ट त्याच्या संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. त्याच्या संघात शेन वॉटसन, ब्रॅड हॉज आणि युवराज सिंग यांचा समावेश आहे.    

असे असतील दोन संघ
पाँटिंग एकादश - मॅथ्यू हेडन, जस्टीन लँगर, रिकी पाँटिंग ( कर्णधार), एलिसे व्हिलानी, ब्रायन लारा, फोएब लिचफिल्ड, ब्रॅड हॅडीन ( यष्टिरक्षक), ब्रेट ली, वासीम अक्रम, डॅन ख्रिस्टीयन, ल्युक हॉज; प्रशिक्षक - सचिन तेंडुलकर

गिलख्रिस्ट एकादश -  अ‍ॅडम गिलख्रिस्ट ( कर्णधार - यष्टिरक्षक), शेन वॉर्न, ब्रॅड हॉज, युवराज सिंग, अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल, अ‍ॅण्ड्य्रू सायमंड, कर्टनी वॉल्श, निक रिएवोल्ड, पीटर सिडल, फवाद अहमद, ( एक खेळाडू जाहीर होणं आहे); प्रशिक्षक - टीम पेन 

Web Title: Australia Fire : The two XIs for the Bushfire Cricket Bash have been announced, Adam Gilchrist and Yuvraj Singh in same team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.