Asia Cup 2018: The milestone reached by Mahendra Singh Dhoni in the final | Asia Cup 2018 : 'हा' विक्रम रचणारा महेंद्रसिंग धोनी ठरला पहिला भारतीय
Asia Cup 2018 : 'हा' विक्रम रचणारा महेंद्रसिंग धोनी ठरला पहिला भारतीय

ठळक मुद्देभारताकडून हा विक्रम रचणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.

दुबई, आशिया चषक 2018  : भारतीय संघात सर्वात अनुभवी खेळाडू आहे तो माजी यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी. भारतीय संघातील तो पडद्यामागचा कर्णधार असल्याचे म्हटलेही जाते. आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धोनीने एक मैलाचा दगड गाठत एक अनोखा विक्रम साकारला आहे. भारताकडून हा विक्रम रचणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.

धोनीने काही दिवसांपूर्वीच एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा पल्ला गाठला होता. हा पल्ला गाठताना धोनीची सरासरी पन्नाशीच्या वर होती. यावरूनच धोनीने सातत्यपूर्ण किती दमदार फलंदाजी केली आहे, हे समजता येऊ शकते. एक यष्टीरक्षक म्हणूनही धोनीने नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

अंतिम सामन्यात धोनीने कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बांगलादेशचा सलामीवीर लिटन दासला यष्टीचीत केले. दासला बाद करत धोनीने एका विक्रमाला गवसणी घातली. हा विक्रम रचणारा तो पहिला भारतीय ठरला. दासला बाद करत धोनीने यष्टीमागे 800 फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम केला. आतापर्यंत एकाही भारतीय फलंदाजाला हा आकडा गाठता आलेला नाही.

Web Title: Asia Cup 2018: The milestone reached by Mahendra Singh Dhoni in the final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.