Ashes 2019: Joe oot's protective armor is broken by a fast ball and he falls to the ground ... | अ‍ॅशेस 2019 : वेगवान चेंडूने जो रुटचे 'गार्ड' तुटले आणि तो जमिनीवर कोसळला...

अ‍ॅशेस 2019 : वेगवान चेंडूने जो रुटचे 'गार्ड' तुटले आणि तो जमिनीवर कोसळला...

लंडन, अ‍ॅशेस 2019 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमधील खुन्नस अ‍ॅशेस मालिकेत पाहायला मिळते. यंदाच्या अ‍ॅशेस मालिकेत तर बऱ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. स्टीव्हन स्मिथला जोफ्रा आर्चरचा चेंडू लागला आणि तो जमिनीवर कोसळला. आता तर इंग्लंडचा कर्णधार जो रुट यालाही वेगवान चेंडूचा फटका बसला आहे. वेगवान चेंडूने जो रुटचे सुरक्षा कवच तुटल्याची गोष्ट आता पुढे आली आहे.


ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने 140 kmphच्या वेगाने 39 व्या षटकात एक चेंडू टाकला. हा चेंडू रुटच्या सुरक्षा कवचाला एवढ्या जोरावर लागला की त्याचे दोन तुकडे झाले. हा धक्का एवढा मोठा होता की, ज्यानंतर रुट थेट जमिनीवर कोसळला. पण त्यानंतर त्याच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले आणि त्याने 71 धावांची खेळी साकारली.

'बेईमान' म्हणणाऱ्या चाहत्याची वॉर्नरने केली बोलती बंद
सध्याच्या घडीला इंग्लंडमध्ये अ‍ॅशेस मालिका सुरु आहे. या मालिकेदरम्यान इंग्लंडचे चाहते ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न करताताना पाहायला मिळत आहेत. एका चाहत्याने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला थेट 'बेईमान' म्हटले. पण त्यावर वॉर्नरने अशी काही प्रतिक्रीया दिली की, त्या चाहत्याची बोलतीच बंद झाल्याचे पाहायला मिळाले.

वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ यांच्यावर चेंडूशी छेडछाडकेल्याप्रकरणी एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर या दोघांची ही पहिलीच अ‍ॅशेस मालिका आहे. स्मिथ हा भन्नाट फॉर्मात आहे. त्याने चौथ्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले आहे. पण वॉर्नरला मात्र आतापर्यंत मालिकेत सूर गवसलेला नाही. वॉर्नर आतापर्यंतच्या सात डावांमध्ये फक्त 11.29च्या सरासरीने 79 धावा केल्या आहेत. त्यामुळे चाहते त्याच्यावर जोरदार टीका करताना दिसतात. या चौथ्या सामन्यात क्षेत्ररक्षणाला जाताना एका चाहत्याने वॉर्नरला बेईमान म्हटले. ही टीका वॉर्नरने पचवली आणि त्या चाहत्याने दोन्ही हाताचे अंगठे दाखवले. त्यानंतर या प्रेक्षकाला अन्य लोकांनी चांगलेच धारेवर धरले आणि त्याची बोलतीबंद झाल्याचे समजले.

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. यावेळी फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला भोपळाही फोडता आला नाही. वॉर्नरला यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आऊट केले. आतापर्यंत वॉर्नरला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा पराक्रम यावेळी ब्रॉडने केला आहे. ब्रॉडने आतापर्यंत दहा वेळा वॉर्नरला कसोटी क्रिकेटमध्ये बाद केले, यापूर्वी हा विक्रम इंग्लंडचाच वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या नावावर होता. अँडरसनने वॉर्नरला 9 वेळा बाद केले होते.

सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर वॉर्नर बाद झाला. जर वॉर्नर पहिल्याच चेंडूवर बाद झाला असता तर त्याला गोल्डन डक, असे म्हटले असते. पण वॉर्नर दुसऱ्या चेंडूवर बाद झाल्यामुळे त्याला 'Silver Duck' असे म्हटले गेले.

Web Title: Ashes 2019: Joe oot's protective armor is broken by a fast ball and he falls to the ground ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.