Anushka Sharma aggravated; Silence finally left that 'serious' topic | अनुष्का शर्मा भडकली; 'त्या' गंभीर विषयावर अखेर सोडले मौन
अनुष्का शर्मा भडकली; 'त्या' गंभीर विषयावर अखेर सोडले मौन

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा सध्याच्या घडीला भलतीच भडकलेली दिसत आहे. काही गंभीर आरोप करण्यात आले होते, यावर आता अनुष्काने मौन सोडले आहे.

आतापर्यंत अनुष्का बऱ्याचदा ट्रोल झाली आहे. विराटबरोबर फिरताना अनुष्काला बऱ्याचदा ट्रोल केले गेले आहे. त्याचबरोबर अनुष्का ही विराटसाठी अनलकी असल्याचेही म्हटले गेले आहे. पण आतापर्यंत या सर्व विषयांवर अनुष्का काहीच बोलली नव्हती. पण आता नेमकं असं काय घडलंय की, अनुष्का भडकलेली पाहायला मिळाली.

अनुष्का ही विराटबरोबर बऱ्याच स्पर्धांना उपस्थिती लावते. अनुष्का इंग्लंडमध्ये झालेला विश्वचषक पाहायलाही गेली होती. यावेळी अनुष्काचा पाहुणचार निवड समितीचे सदस्य करत होते. अनुष्काला चहा देणे, तिचे चहाचे कप उचलणे, असे प्रकार निवड समितीमधील सदस्य करत होते, असा खळबळजनक खुलासा भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांनी केला होता. यावर अनुष्का भडकलेली पाहायला मिळाली.

अनुष्काने याबाबत एक ट्विट केले आहे. यामध्ये अनुष्काने लिहिले आहे की, " या आरोपांमध्ये काहीही सत्य नाही. मी इंग्लंडमध्ये सामना पाहायला गेले होते. पण तेव्हा माझ्याबरोबर एकही निवड समितीचे सदस्य नव्हते. मी कुटुंबियांच्या स्टँडमध्ये बसली होती. त्यामुळे या आरोपांचा काहीही संबंध नाही. जर तुम्हाला निवड समितीवर टीका करायची असेल तरमला त्यामध्ये का ओढत आहात."

Web Title: Anushka Sharma aggravated; Silence finally left that 'serious' topic

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.