रोहित शर्मानं युजवेंद्र चहलला दिले फटके, Video व्हायरल

भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्माला दुखापतीमुळे न्यूझीलंड दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परत यावं लागलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 10:22 AM2020-02-26T10:22:38+5:302020-02-26T10:24:10+5:30

whatsapp join usJoin us
Another tik tok video by Yuzvendra chahal, but this time he is with rohit sharma and khalil ahmed svg | रोहित शर्मानं युजवेंद्र चहलला दिले फटके, Video व्हायरल

रोहित शर्मानं युजवेंद्र चहलला दिले फटके, Video व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्माला दुखापतीमुळे न्यूझीलंड दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परत यावं लागलं होतं. ट्वेंटी-20 मालिकेतील विजयानंतर रोहितला वन डे आणि कसोटी मालिकेला मुकावे लागले. त्यानंतर टीम इंडियाला वन डे मालिका गमवावी लागली आणि आता कसोटी मालिकेतील पहिला सामनाही भारतानं गमावला. मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर टीम इंडियातील काही सदस्य मायदेशी परतले आहेत. त्यात लोकेश राहुल, मनीष पांडे, युजवेंद्र चहल यांचा समावेश आहे. युजवेंद्रनं मायदेशी परतल्यानंतर रोहितची भेट घेतली, परंतु त्याला रोहितनं चांगलेच फटके दिले आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

न्यूझीलंड दौऱ्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील चार सामन्यांत रोहितनं 140 धावा केल्या. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. पण, पाचव्या सामन्यात दुखापत झाली आणि त्याला पुढील वन डे व कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली. युजवेंद्रनं ट्वेंटी-20 मालिकेत 3 आणि वन डे मालिकेत 6 विकेट्स घेतल्या. मायदेशी परतल्यानंतर युजवेंद्रचा दोन मुलींसोबत डान्स करतानाचा TikTok  व्हिडीओ केला होता आणि तो चांगलाच व्हायरल झाला होता. चहलच्या त्या व्हिडीओला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक व्ह्यूवर्स मिळाले आहेत.

बुधवारी चहलनं आणखी एक TikTok व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला. त्यात त्याच्यासह रोहित शर्मा आणि खलिल अहमदही आहेत. या व्हिडीओत रोहित आणि खलिल दोघेही चहलला चांगलेच फटके देताना पाहायला मिळत आहेत.


 

Web Title: Another tik tok video by Yuzvendra chahal, but this time he is with rohit sharma and khalil ahmed svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.