5 T20I cricket match series between India and South Africa Women to be played in Surat, Gujarat for the first time | गुजरातमध्ये प्रथमच होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना; भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरस

गुजरातमध्ये प्रथमच होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना; भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरस

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघांमध्ये पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. सुरत जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या यजमानपदाखाली प्रथमच गुजरात येथे आतंरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवण्यात येणार आहे. 25 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. हे सर्व सामने डे-नाईट असणार आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेपूर्वी दोन सराव सामनेही खेळवण्यात येणार आहेत. 

मागील दहा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय सामन्याच्या आयोजनासाठी सुरत क्रिकेट असोसिएशनकडून मागणी होत होती. भारताचा माजी कसोटीपटू राहुल द्रविड याने येथील स्टेडियमची पाहणी केली आणि त्याने या स्टेडियमवर समाधान व्यक्त केले. लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमची प्रेक्षकसंख्या ही 20000 इतकी आहे.  


 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 5 T20I cricket match series between India and South Africa Women to be played in Surat, Gujarat for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.