अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम

Vaibhav Suryavanshi: आयपीएल २०२५ मध्ये आपल्या तुफानी फलंदाजीने खळबळ उडवून देणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आणखी एक झंझावाती खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:38 IST2025-06-11T11:36:49+5:302025-06-11T11:38:17+5:30

whatsapp join usJoin us
14-Year-Old Vaibhav Suryavanshi Blasts 190 Before England Trip | अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम

अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएल २०२५ मध्ये आपल्या तुफानी फलंदाजीने खळबळ उडवून देणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आणखी एक झंझावाती खेळी केली. इंग्लंडला जाण्यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे मंगळवारी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात त्याने अवघ्या ९० चेंडूत १९० धावांची वादळी खेळी केली. वैभवच्या फलंदाजीने पुन्हा एकदा क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले.

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वैभव सूर्यवंशीचे भारताच्या अंडर-१९ संघात निवड झाली. भारताचा अंडर-१९ संघ येत्या २४ जून ते २३ जुलैदरम्यान इंग्लंड दौऱ्यावर असेल. या दौऱ्यात भारतीय संघ पाच एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. याशिवाय, भारतीय संघ ५० षटकांचा एक सराव सामना देखील खेळला जाणार आहे. इंग्लंड दौऱ्यात वैभव सूर्यवंशी भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेसोबत डावाची सुरुवात करताना दिसेल.

आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतक
वैभव सूर्यवंशीने वयाच्या १२व्या वर्षी भारतीय क्रिकेट जगतात आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. रणजी ट्रॉफीमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. पंरतु, आयपीएल २०२५ मध्ये शुभमन गिलच्या गुजरात टायटन्स संघाविरुद्ध अवघ्या ३५ चेंडूत शतक झळकावल्यानंतर तो प्रकाशझोतात आला. आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज आहे. 

मैदानात पाडला चौकार- षटकारांचा पाऊस!
एनसीएमध्ये खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात वैभव सूर्यवंशीने तीच शैली दाखवली, ज्यासाठी त्याने आपली ओळख मिळवली. मंगळवारी खेळल्या गेलेल्या या सराव सामन्यात वैभवने लाँग-ऑन आणि मिडविकेटवर लांब-लांब षटकार मारले. त्याच्या खेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Web Title: 14-Year-Old Vaibhav Suryavanshi Blasts 190 Before England Trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.