वरोऱ्यात थरारक घटना; कारवाईच्या भीतीने ट्रॅक्टर मालकाची विहिरीत उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 16:46 IST2025-06-21T16:33:26+5:302025-06-21T16:46:43+5:30
Chandrapur : अवैधरीत्या रेती वाहतूक

Thrilling incident in Varora; Tractor owner jumps into well fearing action
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : विनापरवाना रेती वाहतुकीवर विभागाकडून महसूल सुरु असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर प्रणय गारघाटे या ट्रॅक्टर मालकाने गुरुवारी (दि. १९) सायंकाळी वडगाव गावाजवळील विहिरीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली.
...अशी घडली घटना
अवैधरीत्या रेती वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर, बामर्डा - वडगाव रस्त्यावर एक विनापरवाना ट्रॅक्टर अडवले. ट्रॅक्टरमालक आणि चालकाकडे कागदपत्रे नसल्याचे आढळून आल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली. दरम्यान, भीतीने प्रणय गारघाटे याने जवळ असलेल्या विहिरीत उडी घेतली.
जीव वाचविण्यात यश
प्रणय गारघाटे याने विहिरीत उडी घेतल्याचे लक्षात येताच महसूल पथकातील अधिकारी आणि उपस्थित नागरिकांनी तत्काळ आरडाओरड केली. गावकऱ्यांनी धाव घेत विहिरीतून त्याला बाहेर काढले. यानंतर तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील चौकशी सुरू करण्यात आली. काहीजण जास्त कमाईच्या लोभाने अवैधरीत्या रेतीची वाहतूक करत आहेत.