रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वारासह तिघे गंभीर जखमी
By राजेश मडावी | Updated: April 18, 2023 14:25 IST2023-04-18T14:24:22+5:302023-04-18T14:25:59+5:30
जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले

रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वारासह तिघे गंभीर जखमी
चंद्रपूर : सावली तालुक्यातील निमगाव ते विरखल चक मार्गावर एका दुचाकीला रानडुकराने धडक दिल्याने दुचाकीस्वारासह तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजता घडली. जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मोरेश्वर महादेव रोहणकर (४५), वृषभ रोहणकर (४), समीक्षा आनंदराव मलोडे (१५) अशी जखमींची नावे आहेत.
मौशी खांब येथील रहिवासी मोरेश्वर रोहणकर हे वृषभ रोहणकर, समीक्षा मलोडे यांना घेऊन निमगाव येथे विवाहासाठी गेले होते. विरखल चक येथे परत येताना सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास रानडुकरांचा कळप दुचाकीसमोर आडवा आला. अशातच एका डुकराने दुचाकीला धडक दिली. या धडकेत मोरेश्वर रोहणकर, वृषभ रोहणकर, समिक्षा मलोडे हे जखमी झाले. तिघांनाही गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.