थंडीत आंघोळीला अति गरम वा गार पाणी वापरणाऱ्यांना आहे 'हार्ट अटॅक'चा धोका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 13:49 IST2024-12-12T13:47:36+5:302024-12-12T13:49:07+5:30

Chandrapur : ना अती थंड ना गरम, कोमट पाण्याचा करा वापर

There is a risk of 'heart attack' for those who use very hot or cold water for bathing in the cold! | थंडीत आंघोळीला अति गरम वा गार पाणी वापरणाऱ्यांना आहे 'हार्ट अटॅक'चा धोका !

There is a risk of 'heart attack' for those who use very hot or cold water for bathing in the cold!

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर :
हिवाळ्यात थंडी घालवण्यासाठी अनेक जण अति गरम पाण्याने आंघोळ करतात, तर काही जण थंडगार पाण्याने आंघोळ करतात. मात्र, अति गरम आणि अति गार पाण्याने आंघोळ करणे म्हणजे हृदयविकाराला आमंत्रण देणे आहे. त्यामुळे कोमट पाण्याने आंघोळ करावे, असा सल्ला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमित ढवस यांनी दिला आहे. 


हृदयाच्या स्नायूच्या भागाला पुरेसे रक्त मिळत नाही. हृदयाच्या धमन्या अचानक अरुंद झाल्यामुळे आणि त्यांच्यामध्ये रक्तप्रवाह अतिशय मंद झाल्याने हृदयविकार येत असतो. थंडीत आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्तदाब वाढतो. त्यामुळे आपल्या हृदयावर अतिरिक्त दाब निर्माण होतो. अशा वेळी अति गार पाण्याने किंवा अति गरम पाण्याने आंघोळ करणे धोकादायक ठरू शकते. 


हृदयरुग्णांनो, थंडीत ही काळजी घ्या 
शरीर उबदार ठेवण्यासाठी गरम कपड्यांचा वापर करा, बाहेर पडताना नेहमी टोपी, हातमोजे आणि मफलर घाला, थंड हवामानात जास्त मेहनत किंवा जोरदार व्यायाम टाळा, कारण यामुळे हृदयावर ताण येतो. ब्लड प्रेशर कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवा.


थंडीत आंघोळीला कोमट पाणी चांगले 
थंडीच्या दिवसात अति गरम किवा अति गार पाण्याने आंघोळ करण्यापेक्षा कोमट पाण्याने आंघोळ करणे चांगले असते.


तणावमुक्तीसाठी गरम पाण्याची आंघोळ 
गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीर आणि मनाला शांती मिळते. यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि स्नायूंना आराम मिळतो


कडक पाणी, साबणाने अंग तडकते 
कडक पाण्याने आंघोळ केल्यास साबणाचा वापर केल्यास अंग तडकण्याची भीती असते. त्यामुळे कोमट पाणी वापरावे.


कडक पाण्याने अंघोळ केल्यास
रक्तदाब वाढतो : कडक पाण्याने अंघोळ केल्यास रक्तदाब वाढण्याचा धोका अधिक असतो.
हृदयावर ताण वाढतो : थंडीत अति गरम पाण्याने आंघोळ केल्यास हृदयावर अतिरिक्त ताण पडण्याचा धोका असतो. 


हृदयविकारतज्ज्ञ म्हणतात... 
थंडीच्या दिवसात हृदयविकारचा धोका अधिक असतो. त्यामुळे थंडीत आवश्यक ती काळजी घ्यावी. आंघोळीसाठी अति गार किंवा अति गरम पाण्याचा वापर न करता कोमट पाण्याचा वापर करावा. यासोबतच थंडीत उबदार कापड्याचा वापर करा. हृदयाची समस्या असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा. -डॉ. अमित ढवस हृदयरोग व मधुमेहतज्ज्ञ, चंद्रपूर

Web Title: There is a risk of 'heart attack' for those who use very hot or cold water for bathing in the cold!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.