गावाचं नावच चुकलं! राष्ट्रीय महामार्गावरील फलकांमध्ये भल्याभल्यांच्या भूगोलाची वाट लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 15:33 IST2025-06-14T15:31:23+5:302025-06-14T15:33:45+5:30

सुधारण्याची अपेक्षा : वाहतूकदार पडतात संभ्रमात

The village name was wrong! The billboards on the national highways are wrong | गावाचं नावच चुकलं! राष्ट्रीय महामार्गावरील फलकांमध्ये भल्याभल्यांच्या भूगोलाची वाट लागली

The village name was wrong! The billboards on the national highways are wrong

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना :
राष्ट्रीय महामार्ग निर्मितीच्या कन्स्ट्रक्शन कंपनीने गुगलच्या आधारावर गाव नाम फलक तयार केले; परंतु गुगलने दर्शवलेले लोकेशन चुकीचे व मराठी आद्य अक्षरात असलेली घोडचूक फलकाच्या पथ्यावर पडली आहे. परिणामी, चुकीची माहिती वाहतूकदार व नवीन व्यक्तींना संभ्रमात टाकत आहे. 


कन्हाळगाव ऐवजी कन्हारगाव, चनई खुर्दच्या जागी चनई बूज, जेवरा फाटा ठिकाणी पैनगंगा नदी, कुसळऐवजी कुशल, देवघाट रिठ फाटा स्थळी कुशल, लालगुडा फाटाच्या स्थानी नांदा फाटा, तर गणेशमोड रिठ फाटा फलक दत्त मंदिर पुढे ललावण्याऐवजी लोणीजवळ लावले आहे. इजापूर गावच्या नंतर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर नसलेल्या झुलबर्डी गावाचे फलक राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आले आहे. 


अनेक ठिकाणी तर फलकच नाही
परसोडा, गोविंदपूर, कोठोडा बूज, मेहंदी, दुर्गाडी, रुपापेठ, अकोला, जेवरा, थोपटाळा फाटा, देवघाट रिठ फाटा, लोणी, पिपर्डा, वनसडी, दहेगाव रिठ, पारंबा, सोनुर्ली, आसन, रामपूर, लालगुडा, इंजापूर, बीबी आदी गावांच्या फाट्यावर गाव फलकच लावण्यात आले नाही. राज्य सीमा, पारडी, गडचांदूर येथील मोठ्या फलकातून तालुक्याचे प्रमुख स्थान असलेल्या कोरपनाला फलकात स्थान न देता, त्या स्थानापासून महत्त्वपूर्ण नसलेल्या भोराज, गडचांदूरचे दिशादर्शन दाखवण्यात आले आहे. पारडी येथील फलकात मुकुटबनचे, नारंडा फाटा येथील फलकात चंद्रपूर, वणीचे, कुसळ फाटा येथे जिवती, पकडीगुडुम धरण, कन्हाळगाव फाटा येथे येल्लापूर, वणी बूज, गादिगुडा आदी प्रमुख स्थळाचे दिशादर्शन लावण्यात न आल्याने कमी अंतराचे मार्ग नवीन व्यक्तींना कळत नाही. यात त्यांना अधिकचे अंतर मोजून प्रवास करावा लागत आहे. या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.


स्थानिक व्यक्तीला सोबत घेणे होते गरजेचे
ही सर्व फलके महामार्गाच्या माहिती व सौंदर्यात्मक दृष्टिकोनाने महत्त्वाची असल्याने स्थानिक व्यक्तीला सोबत घेऊन फलक तयार करणे आवश्यक होते; परंतु तसे न झाल्याने फलकांत सावळागोंधळ उडाला आहे.

Web Title: The village name was wrong! The billboards on the national highways are wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.