वडिलाने केला पोटच्या मुलाचा खून; पोंभुर्णा तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2022 11:35 IST2022-08-05T11:34:40+5:302022-08-05T11:35:04+5:30

डोक्यावर केले उभारीने वार

The father killed the son by stabbing him on the head | वडिलाने केला पोटच्या मुलाचा खून; पोंभुर्णा तालुक्यातील घटना

वडिलाने केला पोटच्या मुलाचा खून; पोंभुर्णा तालुक्यातील घटना

पोंभुर्णा (चंद्रपूर) : पोंभुर्णा तालुक्यातील मोहाडा (रै) येथील जन्मदात्या बापाने पोटच्या मुलाचा खून केला. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. समीर कन्नाके (२०) असे मृताचे नाव असून, घरगुती वादातून हा रक्तसंहार घडला आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील मोहाडा (रै.) येथील बंडू शिवराम कन्नाके याचे मुलगा समीरसोबत मुलगा दारूच्या आहारी गेल्यामुळे पटत नव्हते. बापाचे व मुलाचे रोज भांडण होत होते. त्यातच दीड महिन्यापूर्वी समीर याने वडिलाला बेदम मारहाण केली होती. यात वडील गंभीर जखमी झाले होते. त्यांना नागपूर येथे वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले होते. तो काही दिवसांपूर्वीच मोहाडा येथे आले होता. मुलासोबत झालेल्या भांडणामुळे व पटत नसल्यामुळे तीन दिवसांपासून तो आपल्या शेतातील झोपडीत पत्नी व मुलीसोबत राहत होता.

दरम्यान, समीर हा गावातील घरात एकटाच राहत होता. घटनेच्या दिवशी समीर हा शेताकडे गेला. त्याचे वडिलांसोबत कडाक्याचे भांडण झाले. भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात जन्मदात्या बापाने पोटच्या मुलाला बंडीच्या उभारीने डोक्यात वार केला. यात समीर जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच पोंभुर्ण्याचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी व उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: The father killed the son by stabbing him on the head