Video : आक्रमक वाघ जिप्सीच्या दिशेने डरकाळी फोडत धावला अन्...
By राजेश भोजेकर | Updated: April 28, 2023 13:25 IST2023-04-28T13:22:03+5:302023-04-28T13:25:15+5:30
व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल

Video : आक्रमक वाघ जिप्सीच्या दिशेने डरकाळी फोडत धावला अन्...
चंद्रपूर : जंगल सफारी करताना आक्रमक झालेला पट्टेदार वाघ पर्यटकांच्या जिप्सीच्या दिशेने डरकाळी फोडत धावल्याने पर्यटकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. डरकाळी फोडत पर्यटकांच्या जिप्सीवर धावून गेलेल्या वाघाचा व्हिडीओ समाज माध्यमावर चांगलाच सार्वत्रिक झाला आहे.
उन्हाळा सुरू होताच पर्यटक जंगल सफारीसाठी व्याघ्र प्रकल्पामध्ये तथा अभयारण्यात जातात. वाघ, बिबट, हत्ती, अस्वल, हरीण, चितळ, सांबर, कोल्हा, नीलगाय यासोबतच इतर वन्य प्राण्यांच्या सोबतीने जंगलात भ्रमंती करतात. अशाच एका जंगलात पर्यटक जंगल सफारीसाठी गेले. जिप्सीतून जंगल सफारी करीत असताना अचानक पट्टेदार वाघ डरकाळी फोडत जिप्सीच्या दिशेने येतो. आक्रमकरित्या डरकाळी फोडणारा वाघ जिप्सीच्या दिशेने धावत असल्याचे बघून पर्यटकांची चांगलीच घाबरगुंडी उडते.
आक्रमक वाघ जिप्सीच्या दिशेने डरकाळी फोडत धावला अन्..., व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल#Lokmat#viralvideo#Tigerpic.twitter.com/qCyXvmIXlk
— Lokmat (@lokmat) April 28, 2023
वाघाला बघून घाबरलेले पर्यटक चालकाला जिप्सी मागे घेण्यास सांगतात. जिप्सी चालक कसाबसा जिस्पी मागे घेतो तरीही वाघाची डरकाळी सुरूच असते. वाघाचा अक्राळविक्राळ चेहरा पाहून जिप्सीतील सारेच पर्यटक घाबरतात. हा व्हिडीओ नेमका कुठचा आहे. माहिती घेतली असता तो ताडोबातील नाही याबाबीला पुष्टी मिळाली.