चंदनखेडा ग्रामपंचायतच्या कार्याची राज्यस्तरावर दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 14:57 IST2021-05-19T14:56:58+5:302021-05-19T14:57:35+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. अशा संकटाच्या घडीला चंदनखेडा ग्रामपंचायत उत्तम कार्य करीत आहे.

चंदनखेडा ग्रामपंचायतच्या कार्याची राज्यस्तरावर दखल
चंद्रपूर: कोरोना संकट काळात अतिशय नियोजनबध्द काम करून गावाला कोरोनामुक्त ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चंदनखेडा ग्रामपंचायतीच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. अशा संकटाच्या घडीला चंदनखेडा ग्रामपंचायत उत्तम कार्य करीत आहे. गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद शाळेमध्ये आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या सहकार्यातून २५ व ग्रामपंचायतचे पाच असे ३० खाटांचे विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. सध्या या विलगिकरण कक्षात १६ कोरोनाबाधित रुग्ण आहे. येथील कर्तव्यदक्ष सरपंच नयन बाबाराव जांभुळे दररोज कोविङ विलगिकरण कक्षात येऊन भेट देतात. त्यांच्याशी संवाद साधतात. त्यांचे हालचाल जाणून घेतात.
स्वतः हजर राहून डॉक्टरांकडून कोविड रुग्णांची तापसणी करुन घेतात. विशेष म्हणजे या कोविड रुग्णांना जेवणाची व्यवस्था समाजिक कार्यकर्ता सुधीर मुडेवार व सरपंच नयन जांभूळे हे स्वखर्चातून करीत आहेत. येथील कर्मचारी दिवसरात्र येथे सेवा देत आहे. या कार्याची दखल पंचायत राज प्रशासनाने राज्य स्तरावर घेतली असून महाराष्ट्रातील सहा पंचायतीपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव चंदनखेडा ग्रामपंचायतीचे उत्तम कार्य म्हणून घोषित केले आहे.