चंद्रपूरच्या आघाडी उमेदवारांचा रंगयोग; काय आहे त्यामागचे रहस्य?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 11:23 IST2019-05-23T11:10:20+5:302019-05-23T11:23:25+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या प्रतिक्षेत असलेले चंद्रपूरचे आघाडीचे उमेदवार भाजपचे हंसराज अहीर आणि काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांच्या पक्षांचा रंग भलेही वेगळा असला तरी, त्यांचा मात्र रंगयोग जुळून आला.

चंद्रपूरच्या आघाडी उमेदवारांचा रंगयोग; काय आहे त्यामागचे रहस्य?
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या प्रतिक्षेत असलेले चंद्रपूरचे आघाडीचे उमेदवार भाजपचे हंसराज अहीर आणि काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांच्या पक्षांचा रंग भलेही वेगळा असला तरी, त्यांचा मात्र रंगयोग जुळून आला.
मतमोजणी सुरू असताना हे दोन्ही उमेदवार पिवळ््या रंगाचा कुडता परिधान करून आल्याने उपस्थितांना कुतूहलाचा व चर्चेचा विषय मिळाला आहे. तसेच
वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र महाडोळे यांचा दुपट्टाही पिवळाच आहे.
आज गुरुवार असल्याने बरेच जण पिवळ््या रंगाची वस्त्रे धारण करतात. तसे केल्याने हा दिवस फलदायी ठरतो असे मानले जाते. तंतोतंत एकाच रंगाचे कुडते घालून आपल्या यशस्वीतेसाठी केलेली प्रार्थना या दोघांपैकी कुणाची फळाला येते ते काही तासांच्या प्रतिक्षेनंतर समजेलच.