ग्रामीण तरूणाई लकी ड्राच्या विळख्यात; पोलिसांनी कठोर पाऊल उचलण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 12:32 IST2025-01-17T12:31:17+5:302025-01-17T12:32:51+5:30

Chandrapur : लकी ड्रावर कायद्याने बंदी असूनही याठकबाजांच्या जाळ्यात तरूणाई

Rural youth in the grip of lucky draw; Demand for strict action from police | ग्रामीण तरूणाई लकी ड्राच्या विळख्यात; पोलिसांनी कठोर पाऊल उचलण्याची मागणी

Rural youth in the grip of lucky draw; Demand for strict action from police

लोकमत न्यूज नेटवर्क 
घोसरी :
लकी ड्रा द्वारे दुचाकी व अन्य आकर्षक बक्षिस देण्याची टोळी गावागावात पिरत असल्याने ग्रामीण भागातील तरूणाई विळख्यात सापडत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव परिसरात काही शेतकऱ्यांनाही या लकी ड्रा ने गंडा घातल्याने पोलिसांनी कठोर पाऊल उचलावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.


घोसरी व नांदगाव परिसरात काही महिन्यांपासून लकी ड्रा चालविणायांची टोळी राजरोसपणे पिरत आहे. अशा प्रकारच्या लकी ड्रावर कायद्याने बंदी असूनही याठकबाजांच्या जाळ्यात तरूणाई सापडत आहे. काही दिवसांपूर्वी गडचिरोलीतील एका कथित बचतगटद्वारे समाधान भव्य उपहार योजना लकी सुरू करण्यात आला. हा ड्रॉ नसून स्वयंरोजगार असल्याचा दावा आयोजकाकडून करण्यात आला. ड्रा काढणायांना दुचाकी व विविध आकर्षक बक्षिसांचे आमिष दाखविण्यात आले. ड्रा च्या नावावर सदस्यांची एक लिंक तयार करण्यात आली. एका साखळीत ९९९ सदस्यांचा समावेश असतो. सदस्यांना लाखांची उलाढाल करणे अपेक्षित आहे. यात दुचाकीपासून अनेक वस्तु देण्याचे आमिष दाखविल्याने परिसरातील अनेक युतक बळी पडत आहे. गंडवल्या जात असूनही बदनामी होईल, या भीतीने तक्रारी झाल्या नाही. 


या योजनांचे दाखवतात आमिष 
काही ड्रा चालक फसव्या, आकर्षक, जास्त व्याजदराच्या योजना, कमी कालावधीत दामदुप्पट रक्कम देणाऱ्या योजना चालवतात. साखळी पद्धतीने रक्कम जमा करून लकी ड्रॉच्या योजना राबवतात. संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या फसव्या पिग्मी योजना, फिक्स डिपॉझिट स्किमची भूरळ गावातील मध्यवर्ग कुटुंबांनाही पडल्याचे दिसून येत आहे. 


पोलिसांनी ड्रॉचा भंडाफोड करावा 

  • लकी ड्रा च्या नावाने पैसे गोळा करण्याचे काम सुरू असून या व्यवसायाने परिसरात जम बसविला आहे. यामध्ये बेरोजगार युवकांसोबतच मोबदल्याच्या लालसेने काही शेतकरी देखील सहभाग घेत आहे. 
  • फसव्या योजनांना नागरिकांनी बळी पडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने लकी ड्रॉचा भंडाफोड करत कारवाई करण्याची मागणी आहे.

Web Title: Rural youth in the grip of lucky draw; Demand for strict action from police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.