चंद्रपूरचे विमानतळ घेणार ‘टेक ऑफ’; वन जमिनीसाठी पर्यावरण मंत्रालयात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2022 14:06 IST2022-12-09T14:03:08+5:302022-12-09T14:06:36+5:30
हे विमानतळ संरक्षण विभागासाठीही उपयोगी ठरेल

चंद्रपूरचे विमानतळ घेणार ‘टेक ऑफ’; वन जमिनीसाठी पर्यावरण मंत्रालयात बैठक
नागपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील मूर्ती येथे नव्याने उभारण्यात येत असलेले विमानतळ लवकरच टेक ऑफ घेण्याची शक्यता आहे. विमानतळासाठी लागणाऱ्या वन जमिनीच्या भूसंपादनाचा प्रस्ताव लवकरच केंद्रीय पर्यावरण समितीच्या बैठकीत ठेवला जाणार असून त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, चंद्रपूरच्या विमानतळाची धावपट्टी ही फक्त ९०० मीटर लांबीची आहे. नाही. विमानतळाच्या पाच किलोमीटर परिसरात धूर सोडणारी चिमणी नको, असा नियम आहे. त्यामुळे जुनी धावपट्टी वाढविणे शक्य नाही. त्यामुळे चंद्रपूरहून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या मूर्ती येथे नवे विमानतळ प्रस्तावित आहे. येथे सुरुवातीला २.५ किलोमीटर लांबीची धावपट्टी उभारली जाणार आहे. त्यानंतर ती आणखी ७०० मीटरने वाढविली जाईल. हे विमानतळ संरक्षण विभागासाठीही उपयोगी ठरेल. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. भूसंपादन होताच सहा महिन्यांत हे विमानतळ कार्यान्वित होईल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.