आमदार सुभाष धोटे काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 11:28 IST2023-07-14T11:26:52+5:302023-07-14T11:28:49+5:30

चंद्रपूर जिल्हा काँग्रेसमधील संभ्रम संपला

MLA Subhash Dhote appointed as Chandrapur Congress District President | आमदार सुभाष धोटे काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

आमदार सुभाष धोटे काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

चंद्रपूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने अखेर काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आमदार सुभाष धोटे यांची नियुक्ती केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी वेणुगोपाल यांनी गुरुवारी त्यासंदर्भात पत्रक जारी केले. विशेष म्हणजे, गेल्या महिनाभरापासून पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाबाबत संभ्रमाचे वातावरण होते. गेल्या काही दिवसांत झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप झाले.

भाजपसोबत युती, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना तडकाफडकी निलंबित करून आमदार सुभाष धोटे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती, मात्र नंतर अ. भा. काँग्रेस कमिटीने या नियुक्तीला स्थगिती देत पदावर कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या. तेव्हापासून या पत्राचा आधार घेत माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे या पदावर आपला दावा करत होते. ग्रामीण त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. आता जारी झालेल्या पत्रकामुळे काँग्रेस- जिल्हाध्यक्षपदाबाबतचा संभ्रम दूर झाला आहे.

Web Title: MLA Subhash Dhote appointed as Chandrapur Congress District President