पुरग्रस्तांच्या शेतीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्या, पालकमंत्री मुनगंटीवार यांचे निर्देश

By राजेश भोजेकर | Updated: July 17, 2023 17:43 IST2023-07-17T17:42:36+5:302023-07-17T17:43:17+5:30

अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Make panchnama of the agriculture of the flood victims and give immediate compensation; Sudhir Mungantiwar's Instructions to Collector | पुरग्रस्तांच्या शेतीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्या, पालकमंत्री मुनगंटीवार यांचे निर्देश

पुरग्रस्तांच्या शेतीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्या, पालकमंत्री मुनगंटीवार यांचे निर्देश

चंद्रपूर : मुसळधार पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यांची वाताहत केली. यात प्रामुख्याने चिमूर, नागभीड व सिंदेवाही या तालुक्यांना पुराचा फटका सहन करावा लागला. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे पूरपरिस्थितीचे पंचनामे करून शेतकरी व नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई द्या, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावांना पुराने वेढले. मात्र चिमूर, नागभीड व सिंदेवाही या तालुक्यांना सर्वाधिक फटका सहन करावा लागला. याठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सोमवारी (१७ जुलै २०२३) ना. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून नुकसान भरपाईच्या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

गेल्या दोन दिवसांत तीन तालुक्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. यात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्याही घरांचे नुकसान झाले. त्यांनाही नुकसान भरपाईचा मोबदला देण्याचे निर्देश शेतकऱ्यांच्याप्रती संवेदनशील असलेले ना. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

Web Title: Make panchnama of the agriculture of the flood victims and give immediate compensation; Sudhir Mungantiwar's Instructions to Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.