Maharashtra Nagar Parishad Election Result : विदर्भात नेत्यांची ताकद जाणीवपूर्वक कमी केल्याचा सुधीर मुनगंटीवार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 19:56 IST2025-12-21T19:53:33+5:302025-12-21T19:56:01+5:30

Chandrapur : जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांचे निकाल हे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल न राहता, भाजपसाठी गंभीर राजकीय इशारा ठरले आहेत.

Maharashtra Nagar Parishad Election Result: Sudhir Mungantiwar alleges that the power of leaders in Vidarbha has been deliberately reduced | Maharashtra Nagar Parishad Election Result : विदर्भात नेत्यांची ताकद जाणीवपूर्वक कमी केल्याचा सुधीर मुनगंटीवार यांचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Election Result: Sudhir Mungantiwar alleges that the power of leaders in Vidarbha has been deliberately reduced

चंद्रपूर : जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांचे निकाल हे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल न राहता, भाजपसाठी गंभीर राजकीय इशारा ठरले आहेत. सलग काही निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपला मिळणारा जनाधार या निकालांमधून कमकुवत होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. विशेष म्हणजे, पराभवामागे विरोधकांपेक्षा पक्षातील अंतर्गत कारणे अधिक जबाबदार असल्याचे भाजपचेच ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उघडपणे मान्य केल्याने या निकालांचे राजकीय महत्त्व अधिक वाढले आहे.

मुनगंटीवारांच्या वक्तव्यातून भाजपमधील अंतर्गत गटबाजी, नेतृत्वाचा अभाव आणि संघटनात्मक विस्कळीतपणा समोर येतो. विदर्भात काही नेत्यांची ताकद जाणीवपूर्वक कमी केल्याचा आरोप म्हणजे थेट नेतृत्वाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह आहे. मजबूत स्थानिक नेतृत्वाला डावलून ‘इनकमिंग’ नेत्यांना पुढे केल्यामुळे जुने कार्यकर्ते नाराज झाले, याचा फटका मतदानाच्या दिवशी दिसून आला.

दुसरीकडे काँग्रेसने विदर्भात स्थानिक नेतृत्वाला स्वातंत्र्य व ताकद दिल्याचा उल्लेख करून मुनगंटीवारांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या रणनीतीतील त्रुटी अधोरेखित केल्या आहेत. निवडणुका केवळ मोदी फॅक्टर किंवा केंद्रातील सत्तेच्या जोरावर जिंकता येत नाहीत; स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि नेतृत्वावरचा विश्वास निर्णायक ठरतो. यावरून स्पष्ट होते.

चंद्रपूरमधील हा निकाल भाजपसाठी ‘वेळेत सावध व्हा’ असा इशारा आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने जर अंतर्गत मतभेद, गटबाजी आणि नेतृत्वावरील असमाधान दूर केले नाही, तर हा फटका केवळ नगरपरिषदांपुरता मर्यादित न राहता व्यापक राजकीय परिणाम घडवू शकतो.

Web Title : महाराष्ट्र नगर परिषद चुनाव: मुनगंटीवार ने विदर्भ नेताओं को कमजोर करने का आरोप लगाया

Web Summary : चंद्रपुर नगर परिषद के नतीजे भाजपा के लिए खतरे की घंटी। मुनगंटीवार ने विदर्भ के नेताओं को कमजोर करने का आरोप लगाया। स्थानीय नेतृत्व की अनदेखी से भाजपा को नुकसान। कांग्रेस का स्थानीय ध्यान सफल रहा, आगामी चुनावों के लिए चेतावनी।

Web Title : Maharashtra Nagar Parishad Election: Munugantiwar Alleges Deliberate Weakening of Vidarbha Leaders

Web Summary : Chandrapur Nagar Parishad results signal trouble for BJP. Munugantiwar alleges internal sabotage weakened Vidarbha leaders. Neglecting local leadership hurt BJP. Congress' local focus paid off, a warning for upcoming elections.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.