Lok Sabha Election 2019; Voters celebrate democracy celebration | Lok Sabha Election 2019; मतदारांनी साजरा केला लोकशाहीचा उत्सव
Lok Sabha Election 2019; मतदारांनी साजरा केला लोकशाहीचा उत्सव

ठळक मुद्देरांगोळी काढून मतदारांचे स्वागतआबालवृद्धांसह तरुणांनीही बजावला प्रथमच अधिकारमतदार करणाऱ्यांमध्ये उत्सुकता

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी २ हजार १९३ मतदार केंद्रात गुरुवारी मतदान पार पडले. लोकशाहीचा उत्सव असलेल्या या मतदान प्रक्रियेमध्ये आबालवृद्धांसह मोठ्या प्रमाणात तरुणांनी आपला हक्क बजावला. विशेष म्हणजे, प्रथमत: मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता बघायला मिळाली. लोकशाही आणखी बळकट करण्यासाठी दिव्यांग, अंध मतदारांनीही आपला हक्क बजावला. मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्साहात काही त्रुट्याही होत्या. यावर काही मतदारांनी संतापही व्यक्त केला.

२४ तासात मतदारांनी केले ९०६ कॉल
चंदपूर : लोकसभा मतदानासाठी मतदारांची तारांबळ उडू नये यासाठी प्रशासनाने सुरु केलेल्या हेल्पलाईनचा अनेक मतदारांनी आधार घेतला. विशेष म्हणजे, मागील २४ तासामध्ये तब्बल ९०६ जणांनी या हेल्पलाईवर फोन करून आपल्या नावाची माहिती जाणून घेतली. विशेष म्हणजे, गुुरुवारी मतदानाच्या दिवशी ३६३ कॉल १९५० या हेल्पलाईनवर आल्याची माहिती जिल्हा मदत केंद्राचे सहाय्यक संजय डांगे यांनी दिली.
एक तास उशिराने सुरु झाले मतदान केंद्र
चंद्रपूर येथील १६५ क्रमांकाचे माऊंट कॉन्व्हेंट मतदान केंद्र सुरु होताच इव्हीमशीमध्ये बिघाड आला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी ती मशीन जिल्हा कार्यालयाला पाठवून दुसरी मशीन मागविली. त्यामुळे या केंद्रावरील मतदान तब्बल एक तास उशिराने सुरु करण्यात आले. तर रामनगर येथील मतदार केंद्रावरही मतदारांमध्ये गोंधळ झाल्याने काही वेळासाठी मतदान थांबविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
मतदारही अपडेट नाही
मागील काही महिन्यांपूर्वीपासून जिल्हा प्रशासनाने मतदान यादीत नाव नोंदविण्याची मोहीम हाती घेतली होती. एवढेच नाही तर नाव, पत्ता, गाव आदींच्या दुरुस्तीसाठीही मतदारांना आवाहन केले. मात्र यावेळी बहुतांश मतदारांनी प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आहे त्याच स्थितीत मतदार याद्या पुन्हा प्रकाशित झाल्याने हा गोंधळ उडाला. प्रशासनाने आवाहन केल्यानंतर मतदारांनी माहिती जाणून घेतली असती तर मनस्ताप झाला नसता.


Web Title: Lok Sabha Election 2019; Voters celebrate democracy celebration
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.