बाळाला जन्मजात कानाचा दोष असेल तर वेळीच कसे समजेल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 14:54 IST2025-03-01T14:53:32+5:302025-03-01T14:54:14+5:30

Chandrapur : ७० ते ८० डेसिबलपर्यंत आवाज प्रत्येक मनुष्य ऐकू शकतो.

If the baby has a congenital ear defect, how will you know in time? | बाळाला जन्मजात कानाचा दोष असेल तर वेळीच कसे समजेल ?

If the baby has a congenital ear defect, how will you know in time?

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
काही जणांच्या कानात जन्मजात समस्या असते ती वेळीच उपचार न केल्यास वाढते. लहान मुलांच्या कानांची अंतर्गत रचना अत्यंत छोटी व मुलायम असते, अशावेळेस थोडेजरी दुर्लक्ष झाल्यास कानाची समस्या वाढण्याचा धोका असतो, असा सल्ला कान, नाक, तज्ज्ञ डॉ. आशिष पोडे यांनी दिला आहे. काही मुलांमध्ये कमी ऐकू येण्याचा दोष जन्मजात किंवा आनुवंशिक असू शकतो. गर्भावस्थेत आईला डायबिटिस, टॉक्सेमिया असे काही आजार झाले तर होते. काहींना शारीरिक आजार किंवा संसर्गजन्य आजारांमुळे कानाचे विकार होतात.


कानाच्या विकारांची कारणे
जास्त आवाजाचा संपर्क-अति आवाजाच्या ठिकाणी काम केल्याने किंवा राहिल्याने श्रवणशक्ती कमी होऊ शकते. जिथे मोठा आवाज, गोगाट असेल तिथे फार वेळ थांबू नये, श्रवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो.


कानाच्या विकारांपासून बचाव कसा कराल?
मुलांना अंघोळ घालताना त्याच्या कानात पाणी जाऊ नये याची दक्षता घ्यावी. अंघोळीनंतर कान स्वच्छ, कोरडे करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांच्या कानामध्ये तेल घालू नये. कानांची तपासणी केली पाहिजे. ध्वनी प्रदूषणामुळे कानांची ऐकण्याची क्षमता कमी होऊ लागते.


वाढत्या आवाजामुळे होणारे परिणाम
७० ते ८० डेसिबलपेक्षा जास्त आवाज हा कानांसाठी धोकादायक असतो. यामुळे आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. काहींना तर बहिरेपणाचाही सामना करावा लागतो. तसेच मोठ्या आवाजामुळे हृदयाचे ठोके वाढणे याचा धोका असतो. त्यामुळे वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.


कानाच्या विकारांचे प्रकार किती?
कानाचा संसर्ग, टिनिटस (कानात आवाज येणे), मेनियर डिसीज (ज्यामुळे श्रवणशक्ती कमी होते आणि शरीराचा तोल सांभाळण्यात अडचणी येतात), कानाचा पडदा फाटणे, इअरवंक्स (कानात मेण जमा होणे), ओटाइटिस मीडिया (कानात सूज येणे), स्विमर्स इअर (पोहताना कानात पाणी जाणे)


शारीरिक इजा किंवा संसर्गजन्य आजार
कानांची व्यवस्थित स्वच्छता न ठेवल्यास दातदुखी, मार लागणे, अॅलर्जी होणे, सौंदर्यप्रसाधनाचा वापर करणे अशा कारणांमुळेही कानाची समस्या होऊ शकते. मार लागल्यास या मुलांना झोपून स्तनपान करवल्यास त्यात इन्फेक्शनची भीती वाढते. कानातील मळ काढण्यासाठी काड्या वापरू नये.


"कानामध्ये वेदना होत असतील, जड वाटत असेल, वारंवार खाज सुटत असेल तर अशावेळी दुर्लक्ष अजिबात करू नका. कानातील घाण काढण्यासाठी इअर बर्डचा वापर करावा, काडी टाकू नये, त्यामुळे जखम होण्याची शक्यता असते. डॉक्टरांच्या परवानगी शिवाय कानात कोणतेही औषधे टाकू नये"
- डॉ. आशिष पोडे, कान, नाक तज्ज्ञ, चंद्रपूर

Web Title: If the baby has a congenital ear defect, how will you know in time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.