शॉटसर्कीटमुळे घराला आग, संसारोपयोगी साहित्य जळून खाक

By राजेश मडावी | Updated: June 6, 2023 15:03 IST2023-06-06T15:00:56+5:302023-06-06T15:03:42+5:30

नागापुरे कुटुंबाला तातडीची नुकसानभरपाई द्यावी, ग्रामस्थांची मागणी

house caught fire due to a short circuit, household materials were burnt in the fire | शॉटसर्कीटमुळे घराला आग, संसारोपयोगी साहित्य जळून खाक

शॉटसर्कीटमुळे घराला आग, संसारोपयोगी साहित्य जळून खाक

चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथे सोमवारी (दि. ५) सायंकाळी ७: ५० वाजतेच्या सुमारास अखिल वसंत नागापुरे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने सात ताेळे सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचे जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाले.

अखिल नागापुरे यांचे कुटुंब सायंकाळी एकत्र जेवण करत होते. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे घराला अचानक आग लागली. घरातील सर्वजण बाहेर निघून मोठा आरडाओरड केल्याने नागरिक मदतीला धावून आले. मिळेल त्या साधनांनी पाण्याचा मारा करून आग विझविली. मात्र, या आगीत आलमारीतील सात तोळे सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे, कपडे, जीवनावश्यक वस्तू इत्यादी जळून खाक झाले. गोंडपिंपरी पोलिसांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनेचा पंचनामा केला. शासनाने नुकसानग्रस्त नागापुरे कुटुंबाला तातडीची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Web Title: house caught fire due to a short circuit, household materials were burnt in the fire